केंद्र प्रमुखामार्फत आनापान साधनेच्या प्रशिक्षण कार्यक्रमाबाबत
१. प्रशिक्षण व आढावा यासाठी दरवर्षी किमान एक शिक्षण परिषद आयोजित करण्याबाबत.
हा उपक्रम कार्यक्षमपणे राबविण्यासाठी वेळोवेळी याचे प्रशिक्षण व आढावा घेणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक शैक्षणिक वर्षात जूलै/ऑगस्ट महिन्यातील शिक्षण परिषद या उपक्रमाच्या प्रशिक्षणासाठी आयोजित करण्यात यावी. याबाबतची अंमलबजावणी खालील प्रमाणे तीन स्तरांवर असेल.
अ) प्रथम केंद्र प्रमुख यांचे प्रशिक्षण
प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षण अधिकारी यांनी नजीकच्या विपश्यना केंद्राशी संपर्क साधून जिल्ह्यातील सर्व केंद्र प्रमुखांचे मित्र उपक्रमांतर्गत आनापान साधनेचे प्रशिक्षण व आढावा आयोजित करण्यात यावा. सहभागींची नोंद ठेवावी (आवश्यक माहिती: नाव, हुद्दा, मोबाईल क्रमांक, शाळेचे नाव, शाळेचा पत्ता). यात विपश्यना केंद्राच्या प्रतिनिधी मार्फत अंदाजे तीन तासांचे प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षणाचा कार्यक्रम खालीलप्रमाणे असेल.
- सत्र १. उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक. सोबत मित्र उपक्रमाची माहिती असलेले एक पत्रक दिलेले आहे त्याचे प्रास्ताविकात वाचन करावे अथवा ऑडिओनुसार उपलब्ध करून देण्यात आलेली माहिती ऐकावी.
- सत्र २. ऑडिओ ट्रॅकद्वारे आनापान साधनेचे प्रशिक्षण. https://mitraupakram.vridhamma.org/ इथून Download करून घ्यावे.
- सत्र ३. मित्र उपक्रम राबविण्याबाबतच्या सविस्तर सूचना ८ ऑगस्ट २०१९ च्या परिपत्रकाचे सामुहिक वाचन.
- सत्र ४. विपश्यना साधनेच्या १० दिवसीय शिबिरात सहभागी होण्यासाठीचे मार्गदर्शन.
- सत्र ५. प्रश्न उत्तरे व अभिप्राय.
ब) केंद्र स्तरावर शिक्षकांसाठी प्रशिक्षण
वरील प्रमाणे प्रशिक्षण पूर्ण केलेले केंद्र प्रमुख आपापल्या केंद्रांत आयोजित केलेल्या शिक्षक परिषदेत सर्व शिक्षकांना खालील प्रमाणे प्रशिक्षण देतील.
- सत्र १. उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक. प्रास्ताविकात परिपत्रकासोबत (परिशिष्ट अ) नुसार दिलेल्या पत्रकाचे वाचन करावे अथवा ऑडिओनुसार उपलब्ध करून देण्यात आलेली माहिती ऐकावी.
- सत्र २. ऑडिओ ट्रॅकद्वारे आनापान साधनेचे प्रशिक्षण.
- सत्र ३. मित्र उपक्रम राबविण्याबाबतच्या सविस्तर सूचना ८ ऑगस्ट २०१९ च्या परिपत्रकाचे सामुहिक वाचन.
- सत्र ४. अभिप्राय.
परिषदेच्या आदल्या दिवशी करावयाची कामे
- सभागृहाची पाहणी करून शक्यतो जमिनीवर मांडी घालून बसण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देणे.
- काही खुर्च्या मांडून ठेवणे जेणेकरून जे शिक्षक प्रशिक्षणास काही कारणास्तव मांडी घालून जमिनीवर बसू शकणार नाहीत त्यांची व्यवस्था होईल.
- ध्वनीक्षेपक व इतर साहित्य उपलब्ध करून ठेवावे व विद्युत पुरवठा सुरू असल्याची खात्री करावी.
- प्रशिक्षणाचे ऑडिओ ट्रॅक डाउनलोड करून घ्यावेत.
- सर्व उपस्थित शिक्षकांना उपलब्ध होतील एवढ्या ८ ऑगस्ट २०१९ च्या परिपत्रकाच्या प्रती काढून ठेवणे.
- सभागृह स्वच्छ करून घ्यावे.
परिषदेच्या दिवशी करावयाची कामे
- वेबसाईट व अँप बाबतचे पत्रक योग्य त्या ठिकाणी प्रदर्शित करावे.
- परिषदेस उपस्थित असलेल्या शिक्षकांची नावे नोंद करून घ्यावीत.
- परिपत्रक दिनांक ८ ऑगस्ट २०१९ च्या प्रत प्रत्येक उपस्थित शिक्षकास द्यावी जेणेकरून सत्र ३ मध्ये सामुहिक वाचन करणे सोयिस्कर होईल.
- प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर अहवाल सादर करावा.
क) शालेय स्तरावर विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण व सराव
केंद्र स्तरावर प्रशिक्षित शिक्षक आपापल्या शाळेत विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण वरील प्रमाणेच शाळेतील योग्य त्या जागेची निवड करून व इतर सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून तसेच परिपत्रक दिनांक ८ ऑगस्ट २०१९ व इतर परिपत्रकातील सूचनांनुसार प्रशिक्षण पूर्ण करतील. यानंतर दररोज शाळा सुरू व सुटताना १०-१० मिनिटे आनापान साधनेचा ऑडिओ ट्रॅकद्वारे सराव करावा.
ड) अनुपस्थित केंद्र प्रमुख व शिक्षकांसाठी प्रशिक्षण
जे केंद्र प्रमुख तसेच शिक्षक शिक्षक परिषदेस व प्रशिक्षणास अनुपस्थित असतील त्यांच्यासाठी नजीकच्या विपश्यना केंद्राच्या मदतीने वरील प्रमाणे मित्र प्रशिक्षण आयोजित करण्यात यावे.
याबाबतची परिपत्रके व इतर माहिती.
| Sr. No | Date of Circular | Issued By |
|---|---|---|
| 1 | २९ मे २०२६ | राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे |
| 2 | ८ ऑगस्ट २०१९ | मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व) |
| 3 | ८ डिसेंबर २०२० | शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य |
| 4 | ८ मे २०२६ | राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण |
| 5 | - | केंद्र प्रमुख व इतर अधिकारी यांसाठी मार्गदर्शक सूचना |
| 6 | - | प्रशिक्षण बाबतचे अनुभव |
| 7 | - | प्रशिक्षण सूचना पत्रक |
| 8 | - | विपसना परिचय पत्रक |
जिल्हा निहाय कार्यवाही
खालील यादीमध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची माहिती उपलब्ध आहे. प्रत्येक जिल्ह्यावर क्लिक केल्यास त्या जिल्ह्यातील केंद्रस्तरीय संसाधन केंद्रांची यादी, जिल्हास्तरीय आदेश व पत्रव्यवहार, केंद्रप्रमुख प्रशिक्षणाची कार्यवाही व छायाचित्रे तसेच अहवाल पाहता येईल.
अहिल्यानगर
४. अहवाल
अकोला
४. अहवाल
अमरावती
४. अहवाल
भंडारा
४. अहवाल
बीड
३. कार्यवाही
४. अहवाल
बुलढाणा
४. अहवाल
चंद्रपूर
४. अहवाल
छत्रपती संभाजीनगर
४. अहवाल
धाराशिव
४. अहवाल
धुळे
४. अहवाल
गडचिरोली
४. अहवाल
गोंदिया
४. अहवाल
हिंगोली
४. अहवाल
जळगाव
४. अहवाल
जालना
४. अहवाल
कोल्हापूर
३. कार्यवाही
४. अहवाल
लातूर
४. अहवाल
मुंबई(SUB)
३. कार्यवाही
४. अहवाल
मुंबई- II
३. कार्यवाही
४. अहवाल
नागपुर
३. कार्यवाही
४. अहवाल
नांदेड
४. अहवाल
नंदुरबार
नाशिक
३. कार्यवाही
४. अहवाल
पालघर
परभणी
पुणे
३. कार्यवाही
४. अहवाल
रायगड
४. अहवाल
रत्नागिरी
३. कार्यवाही
४. अहवाल
सांगली
४. अहवाल
सातारा
४. अहवाल
सिंधुदुर्ग
४. अहवाल
सोलापूर
३. कार्यवाही
४. अहवाल
ठाणे
४. अहवाल
वर्धा
३. कार्यवाही
४. अहवाल
वाशिम
४. अहवाल
यवतमाळ
३. कार्यवाही
४. अहवाल
📌 जिल्ह्यांची माहिती टप्प्याटप्प्याने अद्ययावत केली जात आहे. नवीन माहिती उपलब्ध होताच येथे प्रदर्शित केली जाईल.