छत्रपती संभाजीनगर_Activities
केंद्र—प्रमुख प्रशिक्षण अहवाल
दिनांक १८ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २.०० ते ५.०० महाराष्ट्र राज्य शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा) संभाजीनगर केंद्र प्रमुखांचे आनापान सती प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. एकूण १३९ केंद्रप्रमुख पैकी १२६ केंद्रप्रमुख प्रशिक्षणास हजर होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रशिक्षणार्थींचे रजिस्ट्रेशन साठी किरण बनसोडे, adv. वर्टे सर, भोवते सर ,अजय सरोने सर ,सुनंदा पाटील मॅडम, अनंत मोरे सर, शुभम हिवराळे यांच्या द्वारे मित्र ॲप डाऊनलोड करण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. किरण बनसोडे यांनी उपस्थितांचे स्वागत करून त्यांना उपक्रमाविषयी थोडक्यात माहिती प्रास्ताविकाद्वारे देण्यात आली. कार्यक्रमातील प्रमुख भाग प्रकाश बनसोडे यांनी ऑडिओ ट्रॅकच्या माध्यमातून 70 मिनिटांचे आनापान प्रशिक्षण घेण्यास मदत केली,जीआर वाचनाद्वारे प्रशिक्षणार्थींना मित्र उपक्रम राबवण्यासंदर्भात आवश्यक मार्गदर्शन व सूचना देण्यात आल्या.
जी आर चे वाचन करून निवृत्त शिक्षिका सुनंदा पाटील मॅडम यांनी विपश्यना शिबिर केल्यानंतरचा त्यांच्या आयुष्यात कसा लाभ झाला हे सांगीतले.
विपश्यना सहाय्यक आचार्य अरविंद पाटील सरांनी १० दिवसीय कोर्स ची माहिती दिली. ४६ शिक्षकांनी दहा दिवसांच्या विपश्यना शिबिरास जाण्याची इच्छा व्यक्त केली. संभाजीनगर येथील धम्म सेवकांच्या सहकार्यामुळे मित्र उपक्रम चा सुरळीत पार पडला.
फोटो— केंद्रप्रमुख प्रशिक्षण
👆 मोठ्या आकारात पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा
📌 प्रत्येक केंद्र अंतर्गत शिक्षण परिषदेची माहिती लवकरच उपलब्ध होईल.