भंडारा_Activities
केंद्र—प्रमुख प्रशिक्षण अहवाल
दिनांक ०८ ऑगस्ट २०२६ रोजी धम्मभंडार विपश्यना केंद्र, भंडारा येथे वेळ सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजता मित्र उपक्रमांतर्गत भंडारा जिल्ह्यातील विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, साधन व्यक्ती व शिक्षकांसाठी आणापान प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सहभागींच्या मनाची एकाग्रता, सजगता व मानसिक स्थैर्य विकसित करण्याच्या दृष्टीने आणापान साधनेची ओळख करून देणे आणि प्रशिक्षण देणे.
नागपूर विभागीय टीमचे मा. खोब्रागडे सर व इतर सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षणाचे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विपश्यना सेवा संस्था, भंडारा चे अध्यक्ष मा. दहीवले सर व मा. रामटेके आचार्य यांच्या मार्गदर्शनाचा लाभ सहभागीांना मिळाला. प्रशिक्षणादरम्यान आणापान साधनेची संकल्पना, तिचे महत्त्व आणि नियमित साधनेमुळे एकाग्रता व सजगता विकसित होण्यास होणारी मदत याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशिक्षणास सहभागींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकूण ६० विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, साधन व्यक्ती व शिक्षकांनी प्रशिक्षणात सहभाग घेतला. प्रशिक्षणादरम्यान सहभागींसाठी केंद्रामार्फत सकाळी चहा-बिस्किटे तसेच दुपारच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
सदर प्रशिक्षणामुळे सहभागीना आणापान साधनेचे महत्त्व समजून घेण्याची तसेच दैनंदिन जीवनात तिचा सराव करण्याची प्रेरणा मिळाली. प्रशिक्षणाच्या यशस्वी आयोजनासाठी मा. चवरे आचार्य, मा. देशभ्रतार ट्रस्टी, डॉ. जनबंधु समन्वयक, इतर धम्मसेवक तसेच चाईल्ड टीचर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
फोटो— केंद्रप्रमुख प्रशिक्षण
👆 मोठ्या आकारात पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा
📌 प्रत्येक केंद्र अंतर्गत शिक्षण परिषदेची माहिती लवकरच उपलब्ध होईल.