धाराशिव_Activities

📝

केंद्र—प्रमुख प्रशिक्षण अहवाल

दिनांक १३ ऑगस्ट २०२६ रोजी प्राचार्य, डाएट, धाराशिव येथे केंद्रप्रमुखांसाठी मित्र उपक्रमांतर्गत आनापान ध्यान साधना प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सकाळी ११.०० ते दुपारी २.०० या वेळेत पार पडलेल्या या कार्यशाळेस एकूण ७१ केंद्रप्रमुख उपस्थित होते.

कार्यशाळेच्या सुरुवातीस एस. एस. शिंदे सर व प्रकाश बनसोडे यांनी सर्व केंद्रप्रमुखांना मित्र अँप डाउनलोड करण्याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर स्मिता सोनवणे मॅडम, भाग्यश्री आटोळे मॅडम व विजय बांगर सर यांच्या सहकार्याने सर्व केंद्रप्रमुखांचे रजिस्ट्रेशन पूर्ण करण्यात आले. उपस्थित केंद्रप्रमुखांचे स्वागत प्रशांत गायकवाड सर, रिसर्च असिस्टंट, जिल्हा परिषद, धाराशिव यांनी केले. प्रास्ताविक वाचन नागसेन शिंदे सर, शिक्षक, जिल्हा परिषद, खानापूर, धाराशिव यांनी केले.

त्यानंतर बाबासाहेब जानराव सर यांच्या मार्गदर्शनाखाली ऑडिओ ट्रॅकद्वारे ७० मिनिटांचे आनापान साधना प्रशिक्षण घेण्यात आले. नागसेन शिंदे सर यांनी शासन निर्णयाचे (G.R.) वाचन केले. एस. एस. शिंदे सर यांनी केंद्रप्रमुखांनी शिक्षकांचे प्रशिक्षण कसे घ्यावे, १० दिवसीय विपश्यना कोर्ससाठी नोंदणी, नियमावली व समयसारणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच प्रश्नोत्तर व अभिप्राय सत्रही त्यांनीच संचालित केले.

जी. एस. माने सर, केंद्रप्रमुख, केशेगाव, तालुका धाराशिव यांनी १० दिवसीय विपश्यना शिबिरातील स्वतःच्या अनुभवाचे सादरीकरण करताना केंद्रप्रमुख व विद्यार्थ्यांसाठी आनापान साधनेचे फायदे उपस्थितांसमोर मांडले. वीरप्पा शिंदे सर, अधिव्याख्याता, डाएट, धाराशिव यांनी येणाऱ्या शिक्षण परिषदेत वेळेचे नियोजन करून मित्र उपक्रमाचे प्रशिक्षण शिक्षकांना कसे द्यावे याबाबत मार्गदर्शन केले.

कार्यशाळेत सहभागी झालेल्या ७१ केंद्रप्रमुखांपैकी २२ केंद्रप्रमुखांनी अभिप्राय फॉर्ममध्ये १० दिवसीय विपश्यना कोर्स करण्याची इच्छा व्यक्त केली. वीरप्पा शिंदे सर, कैलाश पिकवणे सर (उप शिक्षणाधिकारी, जि. प. धाराशिव) व एस. एस. शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाने ही कार्यशाळा यशस्वीरित्या पार पडली.

📸

फोटो— केंद्रप्रमुख प्रशिक्षण

👆 मोठ्या आकारात पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा

📌 प्रत्येक केंद्र अंतर्गत शिक्षण परिषदेची माहिती लवकरच उपलब्ध होईल.