चंद्रपूर_Activities

📝

केंद्र—प्रमुख प्रशिक्षण अहवाल

दिनांक 22/08/2026 रोजी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बाबूपेठ चंद्रपूर येथे मित्र उपक्रमा अंतर्गत आनापान साधनेचे प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली .यामध्ये एकुण उपस्थित 91 केंद्रप्रमखापैकी 15 महिला व 76 पुरुष उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला सर्व केंद्रप्रमुख यांना आवश्यक मित्र ॲप डाउनलोड करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच नावनोंदणीची प्रक्रिया सुद्धा पूर्ण करण्यात आली.

प्रमुख उपस्थिती :- DIET चे प्राचार्य श्री विपीन मत्ते सर , विभागीय प्रमुख श्रीमती वैशाली येगुलपवार मैडम, श्री सिद्धेश्वर कांबळे सर ,तसेच श्री अमोल बल्लावार सर

प्रशिक्षणामध्ये सहभागी झालेल्या केंद्रप्रमुखांचे स्वागत नियोजन व प्रभावी मार्गदर्शन श्री प्रितीकमल पाटीलसर यांनी केले .प्रशिक्षणामध्ये आनापान साधनेची उद्दिष्टये, प्रशिक्षणाची पद्धत, शाळांमध्ये प्रभावी अमंलबजावणी तसेच विद्यार्थ्यामध्ये नियमित साधनेचे महत्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. नावनोंदणीची प्रक्रिया सुद्धा पूर्ण करण्यात आली . मार्गदर्शन सुंचनानुसार आपल्या कार्यक्षेत्रातील शिक्षकांना याच पद्धतीने प्रशिक्षण द्यावे असेही मार्गदर्शन करण्यात आले .यामध्ये Audio Track च्या माध्यमातून 70 मिनिटे आनापान प्रशिक्षण देण्यात आले. नियमित आनापान साधनेच्या माध्यमातून मनाची एकाग्रता व शिस्त विकसित करण्याच्या दृष्टीने या प्रशिक्षणाचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले.

DIET चे प्राचार्य विपिन मत्ते सर यांनी या प्रशिक्षणाची अंमलबजावणी करण्याबाबत तसचे प्रत्येक शिक्षक- विद्यार्थ्यांपर्यंत ही आनापान साधना पोहचविण्याची हमी दिली. G.R चे वाचन केंद्रप्रमुख कु ज्ञानदेवी सिताराम वानखेडे मॅडम यांनी केले .त्यानंतर विपश्यना शिबिर संबंधित माहिती देण्यात आली. प्रशिक्षणा विषयीचे अनुभव कथन केंद्रप्रमुख श्री विपिन धाबेकर सर यांनी केले. 10 दिवसीय विपश्यना शिबिरामध्ये जाण्यास इच्छुक असणारे एकुण 31 केंद्रप्रमुख होते. त्यामध्ये 1 केंद्रप्रमुख यांनी दहा दिवसीय विपश्यना शिबीर केलेले होते. विपश्यना शिबिर फार्म भरण्याची माहिती सुद्धा दिली.

धम्म सेवकांच्या सहकार्यामुळे आणि सुयोग्य नियोजनामुळे हे सत्र उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडले. 11 धम्मसेवकांनी आपली धम्मसेवा दिली. यामध्ये तीन बालशिबीर शिक्षिका होत्या. प्रशिक्षणानंतर सहभागी केंद्रप्रमुखांनी शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचा तसेच विद्यार्थ्यांकडून नियमित आनापान साधनेचा सराव करून घेण्याचा संकल्प व्यक्त केला.

GR चे वाचन करतांना केंद्रप्रमुख कु. ज्ञानदेवी वानखेडे मॅडम

अनुभव कथन करतांना केंद्रप्रमुख श्री विपिन धाबेकर सर

📸

फोटो— केंद्रप्रमुख प्रशिक्षण

👆 मोठ्या आकारात पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा

केंद्रप्रमुख प्रशिक्षण १ 🔍 केंद्रप्रमुख प्रशिक्षण २ 🔍 केंद्रप्रमुख प्रशिक्षण ३ 🔍 केंद्रप्रमुख प्रशिक्षण 4 🔍 केंद्रप्रमुख प्रशिक्षण 5 🔍 केंद्रप्रमुख प्रशिक्षण 6 🔍 🔍 🔍

📌 प्रत्येक केंद्र अंतर्गत शिक्षण परिषदेची माहिती लवकरच उपलब्ध होईल.