लातूर_Activities
केंद्र—प्रमुख प्रशिक्षण अहवाल
दिनांक 10 आणि 11 ऑगस्ट 2026 रोजी केंद्रप्रमुख प्रशिक्षण, धम्म आवास विपश्यना केंद्र लातूर सकाळी ११.०० ते २.०० (2 दिवस) येथे पूर्ण झाले. एकूण -71 केंद्रप्रमुख उपस्थित होते. प्रशिक्षणाचे उद्घाटन एस. एस. शिंदे सर यांनी केले.
केंद्रप्रमुखांच्या मित्र उपक्रमाच्या कार्यशाळेच्या सुरुवातीस सर्व केंद्रप्रमुखांना आवश्यक मित्र अँप डाउनलोड करण्याबाबत एस.एस. शिंदे सरांनी व प्रकाश बनसोडे यांनी मार्गदर्शन केले व IVRS नंबर डायल करून घेतला, त्यानंतर सर्व केंद्रप्रमुखांचे रजिस्ट्रेशन करण्यात आले, शामसुंदर कांबळे सर, श्रीकांत गिरी सर, विठ्ठल पाटील सर, विजयकुमार पवार सर यांनी रजिस्ट्रेशन ची सेवा दिली, उपस्थित केंद्रप्रमुखांचे स्वागत व प्रस्ताविक वाचन प्रकाश बनसोडे व प्रीती लांडगे मॅडम यांनी केले, यानंतर प्रकाश बनसोडे आणि रवी लामतुरे सर यांनी ऑडिओ ट्रॅक च्या माध्यमातून 70 मिनिटे आनापान साधनेचे प्रशिक्षण घेण्यात आले. G.R. चे वाचन प्रकाश बनसोडे व निलाक्षी शिंदे मॅडम यांनी केले, 10 दिवसीय विपश्यना शिबिर व विपश्यना केंद्र संबंधित माहिती, प्रश्न उत्तरे घेण्यात आली.
सर्व केंद्र प्रमुखांकडून Feedback Form भरून घेण्यात आले. एकूण 71 केंद्रप्रमुखांपैकी 34 केंद्र प्रमुखांनी 10 दिवसीय विपश्यना कोर्स करण्यासाठी इच्छुक आहेत,असे नमूद केले आहे.
काही केंद्र प्रमुखांनी आमच्या केंद्रांतर्गत येणाऱ्या शिक्षकांचे मित्र उपक्रमाचे प्रशिक्षण धम्म आवास विपश्यना केंद्रावरच व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे. किरन साकोळे सर केंद्रप्रमुख यांनी 10 दिवसीय विपश्यना कोर्स केलेला आहे, त्यांनी त्यांचा अनुभव सर्वांसमोर सांगितला.
फोटो— केंद्रप्रमुख प्रशिक्षण
👆 मोठ्या आकारात पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा
📌 प्रत्येक केंद्र अंतर्गत शिक्षण परिषदेची माहिती लवकरच उपलब्ध होईल.