सातारा_Activities
केंद्र—प्रमुख प्रशिक्षण अहवाल
दिनांक १८ जुलै २०२६ रोजी सातारा जिल्ह्यातील आनंदवन विशेष मुलांची शाळा मास भवन शेजारी, नवीन एमआयडीसी, रहिमतपूर रोड सातारा येथे केंद्रप्रमुखांसाठी आनापान ध्यान साधना प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. हे प्रशिक्षण सकाळी १०.०० ते दुपारी २.०० या वेळेत यशस्वीरित्या पार पडले. प्रशिक्षणा मध्ये 196 केंद्रप्रमुख,धम्म सेवक व इतर साधक धम्म सेवक 41 असे एकूण उपस्थित 237 होते.
प्रशिक्षणाचे उद्घाटन उपशिक्षणाधिकारी श्री. यादव सर यांच्या हस्ते झाले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात केंद्रप्रमुखांनी शिक्षकांना आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आनापान ध्यानाचे प्रशिक्षण योग्य पद्धतीने देऊन विद्यार्थ्यांकडून नियमित सराव करून घ्यावा, असे आवाहन केले.
प्रशिक्षणामध्ये आनापान साधनेची उद्दिष्टे, प्रशिक्षणाची पद्धत, शाळांमध्ये प्रभावी अंमलबजावणी, तसेच विद्यार्थ्यांमध्ये नियमित साधनेचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. केंद्रप्रमुखांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शिक्षकांना याच पद्धतीने प्रशिक्षण द्यावे, असेही मार्गदर्शन करण्यात आले.
सातारा जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्राथमिक व सातारा विपश्यना समिती च्या सुयोग्य नियोजनामुळे प्रशिक्षण उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडले. प्रशिक्षणानंतर सहभागी केंद्रप्रमुखांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचा तसेच विद्यार्थ्यांकडून नियमित आनापान साधनेचा सराव करून घेण्याचा संकल्प व्यक्त केला.
फोटो— केंद्रप्रमुख प्रशिक्षण
👆 मोठ्या आकारात पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा
📌 प्रत्येक केंद्र अंतर्गत शिक्षण परिषदेची माहिती लवकरच उपलब्ध होईल.