गडचिरोली_Activities

📝

केंद्र—प्रमुख प्रशिक्षण अहवाल

मित्र उपक्रम अंतर्गत दिनांक 8 ऑगस्ट 2026 रोजी गडचिरोली जिल्ह्यातील सभागृह, जिल्हा परिषद हायस्कुल गडचिरोली येथे केंद्र प्रमुखांसाठी आनापान ध्यान साधना प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.

संतत पाऊस धारा असुनही अतिशय दुर्गम भागातून केंद्रप्रमुख या प्रशिक्षणासाठी आले व उल्लेखनिय उपस्थिती दर्शविली. 5 महिला व 68 पुरुष असे एकुण 73 केंद्रप्रमुख उपस्थित होते.

प्रशिक्षणाचे नियोजन व प्रभावी मार्गदर्शन श्री प्रिती कमल पाटीलसर यांनी केले. प्रशिक्षणामध्ये आनापान साधनेची उद्दिष्टये, प्रशिक्षणाची पद्धत ,शाळामध्ये प्रभावी अमंलबजावणी तसेच विद्यार्थ्यामध्ये नियमित साधनेचे महत्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

आलेल्या मार्गदर्शन सूचनांनुसार हे प्रशिक्षण घेण्यात आले असून केंद्रप्रमुखांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शिक्षकांना याच पद्धतीने प्रशिक्षण द्यावे असेही मार्गदर्शन करण्यात आले.

धम्मसेवकांच्या सहकार्यामुळे आणि सुयोग्य नियोजनामुळे हे सत्र उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडले. प्रशिक्षणानंतर सहभागी केंद्रप्रमुखांनी शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचा तसेच विद्यार्थ्यांकडून नियमित आनापान साधनेचा सराव करून घेण्याचा संकल्प व्यक्त केला.

परिपत्रकाचे वाचन करतांना केंद्रप्रमुख श्रीमती गिता मेश्राम मॅडम

अनुभव कथन करतांना केंद्रप्रमुख श्री विजय रामटेके सर

📸

फोटो— केंद्रप्रमुख प्रशिक्षण

👆 मोठ्या आकारात पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा

केंद्रप्रमुख प्रशिक्षण १ 🔍 केंद्रप्रमुख प्रशिक्षण २ 🔍 केंद्रप्रमुख प्रशिक्षण ३ 🔍 🔍

📌 प्रत्येक केंद्र अंतर्गत शिक्षण परिषदेची माहिती लवकरच उपलब्ध होईल.