गोंदिया_Activities
केंद्र—प्रमुख प्रशिक्षण अहवाल
मित्र उपक्रमांतर्गत गोंदिया जिल्ह्यातील केंद्रप्रमुखांसाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन दिनांक ०५ ऑगस्ट २०२६ रोजी लक्ष्मणराव माणकर अध्यापक विद्यालय, आमगाव येथे करण्यात आले.
या प्रशिक्षणास गोंदिया जिल्ह्यातील ७७ केंद्रप्रमुखांसह जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET), गोंदिया येथील प्राचार्य, शिक्षण विस्तार अधिकारी, जिल्हा समन्वयक, DIET चे अधिकारी तसेच संबंधित शैक्षणिक अधिकारी उपस्थित होते.
प्रशिक्षणाचे प्रभावी मार्गदर्शन नागपूर येथील मा. सुरेश भुजाडे सर व मा. विपीन साखरे सर यांनी केले. त्यांच्या मार्गादर्शनामुळे हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पार पडले.
प्रशिक्षणाला उपस्थित केंद्रप्रमुखांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. प्रशिक्षण उपयुक्त व मार्गदर्शक ठरल्याची भावना सहभागींकडून व्यक्त करण्यात आली. प्रशिक्षणाच्या यशस्वी आयोजनासाठी धम्म गोंड, ओझाटोला येथील धम्मसेवकांनी मोलाचे सहकार्य केले.
फोटो— केंद्रप्रमुख प्रशिक्षण
👆 मोठ्या आकारात पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा
📌 प्रत्येक केंद्र अंतर्गत शिक्षण परिषदेची माहिती लवकरच उपलब्ध होईल.