धुळे_Activities
केंद्र—प्रमुख प्रशिक्षण अहवाल
दिनांक ०८ ऑगस्ट २०२६ रोजी खान्देश विपश्यना सेंटर, धुळे येथे केंद्र प्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी व शिक्षण अधिकारी यांच्यासाठी आनापान प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर प्रशिक्षणास एकूण ८६ प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस सर्व प्रशिक्षणार्थींना आवश्यक App Download करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थींची Registration प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खान्देश विपश्यना सेंटरचे अध्यक्ष मा. श्री. प्रा. गरुड सर यांनी केले. उपस्थित प्रशिक्षणार्थींचे स्वागत करण्यात आले व त्यानंतर नानासाहेब उत्तमराव पाटील यांनी Vipassana विषय माहिती दिली व कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करण्यात आले.
आनापान प्रशिक्षण कार्यक्रमातील प्रमुख भाग म्हणून Audio Track च्या माध्यमातून सुमारे ७० मिनिटांचे आनापान प्रशिक्षण घेण्यात आले. प्रशिक्षणार्थींना आनापान साधनेची पद्धत प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळाली. नियमित आनापान साधनेच्या माध्यमातून मनाची एकाग्रता व शिस्त विकसित करण्याच्या दृष्टीने या प्रशिक्षणाचे महत्त्व स्पष्ट झाले.
आनापान प्रशिक्षणानंतर G.R. चे वाचन करण्यात आले. यामधून प्रशिक्षणार्थींना आवश्यक मार्गदर्शन व सूचना देण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व प्रशिक्षणार्थींकडून Feedback Form भरून घेण्यात आला. प्रशिक्षणाबाबत प्रशिक्षणार्थींचे अभिप्राय व सूचना जाणून घेण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मा. श्री. प्रा. गरुड सर यांनी आभार मानले. त्यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
सर्व प्रशिक्षणार्थींसाठी सकाळचा चहा-बिस्किटे तसेच दुपारच्या भोजनाची व्यवस्था खान्देश विपश्यना सेंटर, धुळे यांच्या वतीने करण्यात आली होती.
एकूण ८६ केंद्र प्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी व शिक्षण अधिकारी यांच्या सहभागामुळे हा आनापान प्रशिक्षण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व यशस्वीरीत्या संपन्न झाला.
या प्रशिक्षणामुळे प्रशिक्षणार्थींना आनापान साधनेची माहिती, प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि पुढील कार्यासाठी आवश्यक मार्गदर्शन मिळाले. आनापानचा अधिकाधिक प्रसार करून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्य करण्याच्या दृष्टीने हे प्रशिक्षण निश्चितच उपयुक्त ठरले.
माननीय.शिक्षण अधिकारी म .न.पा.शिक्षण मंडळ धुळे साहेब विपश्यना साधक आहेत त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं
शिक्षण विस्तार अधिकारी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं
केंद्र प्रमुख शिरपूर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.
G R च वाचन करतांना केंद्र प्रमुख साहेब
फोटो— केंद्रप्रमुख प्रशिक्षण
👆 मोठ्या आकारात पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा
📌 प्रत्येक केंद्र अंतर्गत शिक्षण परिषदेची माहिती लवकरच उपलब्ध होईल.