ठाणे_Activities
केंद्र—प्रमुख प्रशिक्षण अहवाल
दिनांक ०३ ऑगस्ट २०२६ व ०४ ऑगस्ट २०२६ रोजी धम्मसरीता विपश्यना केंद्र खडवली येथे केंद्रप्रमुख, आनापान साधना प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. ०३ ऑगस्ट च्या प्रशिक्षणास एकूण ४३ प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला. दिनांक ०४ ऑगस्ट २०२६ च्या प्रशिक्षणास एकूण ९४ प्रशिक्षणार्थींनी भाग घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात
कार्यक्रमाच्या सुरुवातीस सर्व प्रशिक्षणार्थींना आवश्यक Mitra App Download करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. IVRS नंबर डायल करून घेतला त्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थींची Registration प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. धम्महॉल मध्ये उपस्थित प्रशिक्षणार्थींचे स्वागत करण्यात आले व कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाचन करण्यात आले. यानंतर AudioTrack च्या माध्यमातून ७० मिनिटे आनापान प्रशिक्षण घेण्यात आले. नियमित आनापान साधनेच्या माध्यमातून मनाची एकाग्रता व शिस्त विकसित करण्याच्या दृष्टीने या प्रशिक्षणाचे महत्त्व स्पष्ट झाले
या कार्यक्रमात आलेल्या प्रशिक्षणार्थी कडून G.R. चे वाचन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व प्रशिक्षणार्थींकडून Feedback Form भरून घेण्यात आला. प्रशिक्षणाबाबत प्रशिक्षणार्थींचे अभिप्राय व सूचना जाणून घेण्यात आल्या. १० दिवशीय विपश्यना शिबिरात जाण्यासाठी व संपूर्ण प्रशिक्षण घेण्याकरिता मा. शिंदे सरांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
धम्मसरीता विपश्यना केंद्र खडवली यांच्यावतीने दोन दिवसाच्या प्रशिक्षणात सकाळचा चहा - बिस्कीट व दुपारच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
या प्रशिक्षणास आलेले सर्व धम्मासेवक व धम्मसेविका यांचे सहकार्य लाभले
७० मिनिटे आणापान साधना करतांना
अनुभव सांगताना केंद्रप्रमुख
केंद्रप्रमुखांना मागदर्शन करतांना शिंदे सर
फोटो— केंद्रप्रमुख प्रशिक्षण
👆 मोठ्या आकारात पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा
📌 प्रत्येक केंद्र अंतर्गत शिक्षण परिषदेची माहिती लवकरच उपलब्ध होईल.