रायगड_Activities

📝

केंद्र—प्रमुख प्रशिक्षण अहवाल

महाराष्ट्र शासन आणि विपश्यना विशोधन संस्था, इगतपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने असलेले "मित्र उपक्रम"अंतर्गत केंद्र प्रमुख प्रशिक्षण (महाड विपश्यना केंद्र) ह्या कार्यशाळेचे आयोजन माननीय प्राथमिक शिक्षणाधिकारी सौ ललिता दहितुल्ये मॅडम यांनी पारित केलेल्या पत्रकानुसार महाड विपश्यना केंद्र ता. महाड, जि. रायगड येथे विपश्यना हॉल मध्ये १७-१८ जुलै तसेच उर्वरित १३ ऑगस्ट २०२६ ला प्रत्येक दिवशी २ सत्रात घेण्यात आले.

प्रत्यक्ष एकूण केंद्र प्रमुख - २२४ असून त्यापैकी १७५ केंद्र प्रमुखांनी सहभाग घेतला. एकूण १७५ प्रतिक्रिया पैकी ८५ केंद्रप्रमुखांनी 10 दिवसीय विपश्यना कोर्स करण्यासाठी इच्छा व्यक्त केली आहे.

केंद्र प्रमुख प्रशिक्षणाच्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश:

विपश्यना साधनेची प्रथम पायरी म्हणजे आनापानसती ही केवळ ध्यानाची पद्धत नसून आपल्या विचारांना, भावनांना आणि कृतींना अधिक जागरूक बनविण्याचा एक मार्ग आहे. विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, संयम, आत्मविश्वास आणि चांगले संस्कार निर्माण करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरू शकतो. प्रशिक्षण हे केवळ एक दिवसाचे नसून, त्यातून मिळालेले ज्ञान शाळेतील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे हीच या प्रशिक्षणाची खरी फलश्रुती आहे.

केंद्र प्रमुखांना 3 तासाचे प्रशिक्षण देऊन त्यांना मित्र प्रशिक्षक म्हणून सक्षम करून त्यांच्या अंतर्गत शाळांमध्ये मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी शांत मन, सकारात्मक दृष्टिकोन, आनंदी आणि नैतिक जीवनाचा पाया निर्माण करणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे.

  1. शाळांमध्ये आनापान ध्यानाचा नियमित सराव विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी मार्गदर्शन करणे.
  2. विद्यार्थ्यांमध्ये शांत मन, सकारात्मक दृष्टिकोन आणि आनंदी जीवन विकसित करण्यासाठी केंद्र प्रमुखांना सक्षम करणे.
  3. 'मित्र उपक्रम' ची माहिती, उद्दिष्टे व कार्यपद्धती केंद्र प्रमुखांना समजावून देणे.
  4. शाळांमध्ये मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्यात सकारात्मक व समन्वयपूर्ण वातावरण निर्माण करण्यास प्रोत्साहन देणे.
  5. विपश्यना व आनापान ध्यानाच्या शास्त्रीय दृष्टिकोनाची माहिती देणे.
  6. केंद्र प्रमुखांना उपक्रमाची अंमलबजावणी, नियोजन, समन्वय व अहवाल प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन करणे.
  7. केंद्र प्रमुखांच्या माध्यमातून मूल्याधारित, तणावमुक्त आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यास हातभार लावणे.

प्रशिक्षण बैठकीत घेण्यात आलेले विषय:

  • मित्र उपक्रम : स्वागत व प्रास्ताविका
  • ७० मिनिटे आनापान प्रशिक्षण (मराठी ट्रॅक)
  • ८ ऑगस्ट २०१९ परिपत्रकाचे वाचन
  • १० दिवसीय विपश्यना शिबिराची माहिती / मित्र अँप इन्स्टॉलेशन
  • प्रश्न उत्तरे / अभिप्राय

प्रमुख अधिकाऱ्यांनी दिलेला संदेश

  • सौ. रत्नप्रभा भालेराव, प्राचार्य डायट पनवेल: "मित्र उपक्रमाच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील सर्व केंद्रप्रमुख यांना आनापान प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामुळे प्रशासकीय कामकाजात येणाऱ्या ताण-तणावांना सकारात्मकरीत्या सामोरे जाऊन विद्यार्थ्यांच्या गुणात्मक, सर्जनशील व संयमित शिक्षणाचा पाया रचला जाईल."
  • श्री. राजवर्धन नाईक सर, खालापूर BEO: "शांत, सजग मन हीच खरी शिक्षणाची पायाभरणी आहे; 'मित्र' उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या तालुक्यातील प्रत्येक शाळेत एकाग्र, तणावमुक्त आणि मूल्याधिष्ठित पिढी घडवण्याचे सामर्थ्य केंद्रप्रमुखांच्या नेतृत्वातून नक्कीच सिद्ध होईल."
  • सौ. दिपा परब मॅडम, खालापूर BEO: "आमच्या केंद्रातील केंद्र प्रमुखांना आनापान सती प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त व मनःशांती देणारे अनुभव ठरले. या प्रशिक्षणातून एकाग्रता, आत्मनिरीक्षण आणि मनावर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्व समजले."
  • श्री सागर पवार सर, उरण BEO: "अतिशय सुरेख उपक्रम आहे." तसेच खालापूर BEO श्री राजवर्धन नाईक सरांच्या मित्र उपक्रमाच्या सकारात्मक विचारांशी सहमत आहेत.

सहभागींचा प्रतिसाद

मित्र प्रशिक्षणाची रचना आणि आयोजन अतिशय चांगले होते. अर्धा तास खाली बसू न शकणारे आज आम्ही तीन तास सलग खाली बसून आनापान साधनेचा आनंद घेतला आणि समाधान वाटले. आनापान प्रक्रियेद्वारे मनात घडणारे बदल जाणवले. विविध शासकीय कामाचा व्याप आणि जबाबदाऱ्या यातून ही आनापान साधना मनाला नक्कीच शांती मिळवून देईल. मन शांतीसाठी अत्यंत उपयुक्त असे प्रशिक्षण असून आज समाजातील घटना पाहिल्यात की आनापानसती साधना ही काळाची गरज आहे असे वाटते. प्रशिक्षणाचा लाभ मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व कुटुंबाचे प्रत्येक व्यक्तीला होईल. एक चांगले निरोगी, शीलवान, आदर्श जीवन जगण्यासाठी हे प्रशिक्षण खूप आदर्शवादी आहे. फक्त श्वासाच्या आधारे मन वर्तमानात टिकवण्यासाठी साधना उपयोगी आहे. संस्काराची आवश्यकता आज ६ ते १४ वयोगटात झाले तर ते चिरकाल ठरणारे आहे. शाळेतील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी पर्यंत हे प्रशिक्षण पोहोचवून त्यांच्याकडून दररोज दहा मिनिटे सराव करून घेऊ. तसेच शाळेतील मुख्याध्यापकांना, शिक्षकांना दहा दिवसीय विपश्यना कोर्सला जाण्यासाठी प्रेरित करू. सर्व आयोजकांचे स्वभाव, बोलणे, मार्गदर्शन खूप चांगले होते. शासनाने आमच्यासाठी प्रशिक्षण राबविल्याबद्दल धन्यवाद!

पुढील कृती:

  1. प्रत्येक केंद्र प्रमुखाने आपल्या कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये मित्र उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करणे.
  2. शिक्षक व विद्यार्थ्यांना आनापान ध्यानाचा नियमित सराव करण्यासाठी प्रोत्साहित करणे.
  3. संबंधित शिक्षक व शाळांशी नियमित समन्वय व संपर्क ठेवणे.
  4. उपक्रमाची शाळानिहाय माहिती व प्रगतीचा आढावा घेणे.
  5. येणाऱ्या अडचणींची नोंद करून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने त्यांचे निराकरण करणे.
  6. मित्र उपक्रमाच्या माध्यमातून अधिकाधिक विद्यार्थी व शिक्षकांपर्यंत ध्यानाचा लाभ पोहोचविणे.
  7. प्रशिक्षणानंतर झालेल्या कार्यवाहीचा नियमित अहवाल व फॉलोअप करणे.
📸

फोटो— केंद्रप्रमुख प्रशिक्षण

👆 मोठ्या आकारात पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा

केंद्रप्रमुख प्रशिक्षण १ 🔍 केंद्रप्रमुख प्रशिक्षण २ 🔍 केंद्रप्रमुख प्रशिक्षण ३ 🔍 केंद्रप्रमुख प्रशिक्षण 4 🔍 केंद्रप्रमुख प्रशिक्षण 5 🔍 केंद्रप्रमुख प्रशिक्षण 6 🔍 🔍 🔍

📌 प्रत्येक केंद्र अंतर्गत शिक्षण परिषदेची माहिती लवकरच उपलब्ध होईल.