अमरावती_Activities
केंद्र—प्रमुख प्रशिक्षण अहवाल
दिनांक 31 जुलै आणि 04 ऑगस्ट 2026 रोजी अमरावती जिल्ह्यातील डायट ऑफिस मालटेकडी रोड अमरावती येथे केंद्रप्रमुखांसाठी आनापान ध्यान साधना प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. हे प्रशिक्षण 31 जुलै ला सकाळी 10.00 ते दुपारी 01.00 आणि दुपारी 2 ते 5 या वेळेत आणि 4 ऑगस्टला दुपारी 02.00 ते 05 वाजेपर्यंत यशस्वीरित्या पार पडले. प्रशिक्षणामध्ये 125 केंद्रप्रमुख,धम्म सेवक व इतर साधक धम्म सेवक 10 असे एकूण उपस्थित 135 होते.
प्रशिक्षणामध्ये आनापान साधनेची उद्दिष्टे, प्रशिक्षणाची पद्धत, शाळांमध्ये प्रभावी अंमलबजावणी, तसेच विद्यार्थ्यांमध्ये नियमित साधनेचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. केंद्रप्रमुखांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शिक्षकांना याच पद्धतीने प्रशिक्षण द्यावे, असेही मार्गदर्शन करण्यात आले.
फोटो— केंद्रप्रमुख प्रशिक्षण
👆 मोठ्या आकारात पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा
📌 प्रत्येक केंद्र अंतर्गत शिक्षण परिषदेची माहिती लवकरच उपलब्ध होईल.