हिंगोली_Activities

📝

केंद्र—प्रमुख प्रशिक्षण अहवाल

'मित्र' (Mind In Training For Right Awareness – MITRA) उपक्रमांतर्गत हिंगोली जिल्ह्यातील केंद्रप्रमुखांसाठी आनापानसती साधनेचे तीन तासांचे प्रशिक्षण दिनांक १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी १.०० या वेळेत आयोजित करण्यात आले. हिंगोली जिल्ह्यात केंद्रप्रमुखांची एकूण संख्या ६८ असून यापैकी ६१ केंद्रप्रमुख प्रशिक्षणास उपस्थित होते.

कार्यशाळेच्या सुरुवातीला हराळ सर यांनी केंद्रप्रमुखांची नोंदणी (Registration) केली. त्यानंतर प्रशांत वाघ सर यांनी सर्व केंद्रप्रमुखांच्या मोबाईलमध्ये मित्र अँप डाउनलोड करून दिले. सर्व केंद्रप्रमुखांना हॉलमध्ये बसविण्यात आले. डॉ. संग्राम जोंधळे सर यांनी उपस्थित सर्व केंद्रप्रमुख व मान्यवरांचे स्वागत करून 'मित्र' उपक्रमाविषयी थोडक्यात माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धम्मपाल भालेराव सर यांनी केले तर प्रास्ताविक वाचन वैशाली वाघ मॅडम यांनी केले.

त्यानंतर ऑडिओ ट्रॅकच्या माध्यमातून सुमारे ७० मिनिटांचे आनापानसती प्रशिक्षण देण्यात आले. वंदनाताई दामले मॅडम यांनी दिनांक ८ ऑगस्ट २०१९ च्या परिपत्रकाचे सामूहिक वाचन केले. पुढे शिक्षण परिषदेत करावयाच्या बाबी व शिक्षकांचे प्रशिक्षण कोणत्या पद्धतीने घ्यावयाचे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. दहा दिवसीय विपश्यना शिबिराबाबत आवश्यक माहिती डॉ. जोंधळे सर यांनी दिली व उपस्थित केंद्रप्रमुखांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देण्यात आली.

आनापानसती साधनेचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतर सहभागी केंद्रप्रमुखांनी साधनेबाबत सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. उपस्थित केंद्रप्रमुखांचे feedback form भरून घेण्यात आले. २३ केंद्रप्रमुख १० दिवसीय विपश्यना शिबिरास जाण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेवटी उपस्थित केंद्रप्रमुखांचे आभार डॉ. श्रीराम राठोड सर यांनी व्यक्त केले.

या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनात धम्मसेवक यांचे मोलाचे सहकार्य लाभले. अशाप्रकारे हिंगोली जिल्ह्यातील केंद्रप्रमुखांचे आनापानसती प्रशिक्षण उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडले.

📸

फोटो व व्हिडिओ — केंद्रप्रमुख प्रशिक्षण

👆 मोठ्या आकारात पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा

📌 प्रत्येक केंद्र अंतर्गत शिक्षण परिषदेची माहिती लवकरच उपलब्ध होईल.