अहिल्यानगर_Activities
केंद्र—प्रमुख प्रशिक्षण अहवाल
दिनांक ३० जुलै २०२६ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, जिल्हा परिषद, अहिल्यानगर येथे केंद्रप्रमुखांसाठी आनापान ध्यान साधना प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. हे प्रशिक्षण सकाळी ११.०० ते दुपारी २.०० आणि दुपारी २.३० ते सायंकाळी ५.३० अशा दोन सत्रांमध्ये यशस्वीरित्या पार पडले. सकाळच्या सत्रात ९९ तर दुपारच्या सत्रात ९२, असे एकूण १९१ केंद्रप्रमुख उपस्थित होते.
प्रशिक्षणाचे उद्घाटन शिक्षणाधिकारी श्री. पाटील सर यांच्या हस्ते झाले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात केंद्रप्रमुखांनी शिक्षकांना आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आनापान ध्यानाचे प्रशिक्षण योग्य पद्धतीने देऊन विद्यार्थ्यांकडून नियमित सराव करून घ्यावा, असे आवाहन केले.
प्रशिक्षणामध्ये आनापान साधनेची उद्दिष्टे, प्रशिक्षणाची पद्धत, शाळांमध्ये प्रभावी अंमलबजावणी, तसेच विद्यार्थ्यांमध्ये नियमित साधनेचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. धुळे येथे आयोजित प्रशिक्षणात देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार हे प्रशिक्षण घेण्यात आले असून, केंद्रप्रमुखांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शिक्षकांना याच पद्धतीने प्रशिक्षण द्यावे, असेही मार्गदर्शन करण्यात आले.
विविध जिल्ह्यांतील धम्मसेवकांच्या सहकार्यामुळे आणि सुयोग्य नियोजनामुळे दोन्ही सत्रे उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडली. प्रशिक्षणानंतर सहभागी केंद्रप्रमुखांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचा तसेच विद्यार्थ्यांकडून नियमित आनापान साधनेचा सराव करून घेण्याचा संकल्प व्यक्त केला.
फोटो— केंद्रप्रमुख प्रशिक्षण
👆 मोठ्या आकारात पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा
📌 प्रत्येक केंद्र अंतर्गत शिक्षण परिषदेची माहिती लवकरच उपलब्ध होईल.