Sangli_Activities

📝

केंद्र—प्रमुख प्रशिक्षण अहवाल

दिनांक 20 जुलै 2026शांतिनिकेतन लोक विद्यापीठ सांगली येथे दुपारी 12 ते 3 या वेळेमध्ये संपन्न झाले

प्रशिक्षणाचे उद्घाटन शिक्षण विस्तार अधिकारी सुलोचना चव्हाण मॅडम यांच्या हस्ते झाले. केंद्रप्रमुखांना मार्गदर्शन करण्यात आले की हे प्रशिक्षण तुम्ही असेच आपल्या केंद्रातील सर्व शिक्षकांना द्यायचे आहे व शिक्षक हे आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना आनापान साधना शिकवतील. रोज मुलांकडून आनापान साधना शाळेत करून घेतील. या प्रशिक्षणासाठी एकूण 139 केंद्रप्रमुख शिक्षक उपस्थित होते. दहा धम्म सेवक उपस्थित होते.

सांगली जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग व धम्म सुगंधा विपश्यना सेंटर सांगली च्या सुयोग्य नियोजनामुळे प्रशिक्षण उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडले. प्रशिक्षणानंतर सहभागी केंद्रप्रमुखांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचा तसेच विद्यार्थ्यांकडून नियमित आनापान साधनेचा सराव करून घेण्याचा संकल्प व्यक्त केला.

📸

फोटो— केंद्रप्रमुख प्रशिक्षण

👆 मोठ्या आकारात पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा

📌 प्रत्येक केंद्र अंतर्गत शिक्षण परिषदेची माहिती लवकरच उपलब्ध होईल.