नांदेड_Activities
केंद्र—प्रमुख प्रशिक्षण अहवाल
पहिला टप्पा दिनांक -5/8/2026 आणि दुसरा टप्पा- दिनांक- 6/8/ 2026 अशा दोन टप्प्यात जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था नांदेड या ते 2 या वेळेत दोन्ही दिवसाचे प्रशिक्षण पूर्ण झाले. या प्रशिक्षणात प्रमुख उपस्थिती क्षेत्रीय आचार्य डॉ. संग्रामजी जोंधळे सर, सहाय्यक आचार्य परशुराम मोरे सर, डाएटचे प्राचार्य निळेकर सर, अध्यक्ष श्री कामाजी पवार सर, प्रा . सुनंदा मोरे मॅडम, वरिष्ठ सहाय्यक आचार्य रघुबीर सिंग उपस्थित होते. पहिल्या टप्प्यात एकूण उपस्थित केंद्रप्रमुख -70 दुसऱ्या टप्प्यात एकूण केंद्रप्रमुख -103, असे एकूण 173 केंद्रप्रमुख उपस्थित होते. प्रशिक्षणाचे उद्घाटन क्षेत्रीय आचार्य डॉ. संग्रामजी जोंधळे सर यांनी केले.
नांदेड येथील प्रशिक्षणात दिलेल्या सूचनानुसार प्रशिक्षण घेण्यात आले व केंद्रप्रमुखांनी शिक्षकांना तसेच प्रशिक्षण द्यावे असे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच सहाय्यकाचार्य मोरे सरांनी आणि क्षेत्रीय केंद्र आचार्य डॉ. जोंधळे सरांनी आनापान वर्तमान राहायला शिकवते आणि विपश्यना वैज्ञानिक विद्या आहे असं त्यांनी समजून सांगितले. तसेच डाएटचे प्राचार्य निळेकर सरांनी आनापान विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी किती महत्त्वाचे आहे मार्गदर्शन करून प्रशिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. केंद्रप्रमुखांनी रजिस्ट्रेशन व प्रशिक्षण शांत आणि आनंददायी वाटला उत्साही वाटला असे आपले अनुभव व्यक्त केले आनापानामुळे मुलांना एकाग्रतेत मदत होईल आणि शिक्षकांना आनंददायी वातावरणात अध्यापन करताना सोपे होईल त्यामुळे आम्ही शाळेत आनापान विद्यार्थ्यांसाठी घेऊ असे सांगितले.
सहभागी केंद्रप्रमुख व विस्तार अधिकाऱ्यांचा प्रतिसाद उत्साही, एकाग्रता व शांततापूर्ण होता. या प्रशिक्षणाला खालील धम्म सेवकांनी आणि धम्म सेविकांनी सेवा दिली. या सर्व धम्म सेवकांच्या सहकार्यामुळे दोन दिवस प्रशिक्षण यशस्वीरित्या पार पडले
फोटो— केंद्रप्रमुख प्रशिक्षण
👆 मोठ्या आकारात पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा
📌 प्रत्येक केंद्र अंतर्गत शिक्षण परिषदेची माहिती लवकरच उपलब्ध होईल.