अकोला_Activities
केंद्र—प्रमुख प्रशिक्षण अहवाल
महाराष्ट्र शासन व विपश्यना रिसर्च इन्स्टिट्यूट, इगतपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने अकोला जिल्ह्यातील केंद्रप्रमुखांसाठी दोन दिवसीय 'MITRA उपक्रम – केंद्रप्रमुख आनापान प्रशिक्षण कार्यक्रम' दिनांक २४ व २५ ऑगस्ट २०२६ रोजी धम्ममंजुषा विपश्यना साधना केंद्र, बोरगाव, अकोला येथे आयोजित करण्यात आला.
पहिल्या दिवशी (२४ ऑगस्ट) ४६ केंद्रप्रमुख तर दुसऱ्या दिवशी (२५ ऑगस्ट) ५६ केंद्रप्रमुख उपस्थित होते. दोन्ही दिवस मिळून एकूण ६८ केंद्रप्रमुख व DIET, अकोला येथील ५ अधिकारी/पदाधिकारी कार्यक्रमात सहभागी झाले.
कार्यक्रमाचे स्वागत श्री. सौरव वाघमारे, प्रस्तावना श्री. साजिद पटेल यांनी केली तर सूत्रसंचालन श्री. सौरव वाघमारे व श्री. प्रकाशजी बनसोडे यांनी केले. एका केंद्रप्रमुखाने शासन निर्णयाचे वाचन केले. कार्यक्रमासाठी आचार्य श्रीमती उषाजी तायडे, आचार्य श्री. रवींद्रजी पोदार, श्री. सुनीलजी तायडे, श्री. दादाराजी तायडे, श्री. विनोद भाऊ कोल्हे व श्री. मनीष हुमणे यांनी मोलाचे सहकार्य केले.
प्रशिक्षणास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सहभागी १० केंद्रप्रमुखांनी दहा दिवसीय विपश्यना शिबिरात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली — ही या कार्यक्रमाची महत्त्वपूर्ण फलश्रुती ठरली. अनुपस्थित केंद्रप्रमुखांसाठी १४ सप्टेंबर २०२६ रोजी प्रशिक्षण आयोजित करण्याची तयारी DIET, अकोलाचे प्राचार्य श्री. ज्ञानेश्वर नागरे सर यांनी दर्शवली असून धम्ममंजुषा केंद्रानेही सहमती दिली आहे.
फोटो व व्हिडिओ — केंद्रप्रमुख प्रशिक्षण
👆 मोठ्या आकारात पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा
📌 प्रत्येक केंद्र अंतर्गत शिक्षण परिषदेची माहिती लवकरच उपलब्ध होईल.