जालना_Activities
केंद्र—प्रमुख प्रशिक्षण अहवाल
दिनांक १९ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १०.०० ते ०१.०० या वेळेत J.E.S. कॉलेज सभागृह, जालना येथे केंद्रप्रमुखांचे आनापान सती प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. एकूण १०६ केंद्रप्रमुखांपैकी ८६ केंद्रप्रमुख प्रशिक्षणास उपस्थित होते. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून उपशिक्षणाधिकारी कायंदे सर, पुजारी सर व विस्तार अधिकारी रवी जोशी सर हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रशिक्षणार्थींच्या नोंदणीसाठी निखिल कुंटे, प्रकाश बनसोडे, किरण बनसोडे, डॉ. हेमा थोरात मॅडम, चांदने मॅडम, पुष्पा सोनकांबळे मॅडम, अनंत मोरे सर व शुभम हिवराळे यांनी मित्र अँप डाउनलोड करण्याविषयी मार्गदर्शन केले. किरण बनसोडे यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविकाद्वारे उपक्रमाविषयी थोडक्यात माहिती दिली.
कार्यक्रमाचा मुख्य भाग म्हणून शुभम हिवराळे यांनी ऑडिओ ट्रॅकच्या माध्यमातून ७० मिनिटांचे आनापान प्रशिक्षण घेण्यास मदत केली. त्यानंतर किरण बनसोडे यांनी शासन निर्णयाचे (G.R.) वाचन केले. उपशिक्षणाधिकारी कायंदे सर यांनी प्रशिक्षणार्थींना मित्र उपक्रम राबविण्यासंदर्भात आवश्यक मार्गदर्शन व सूचना दिल्या. शिंदे सर यांनी १० दिवसीय विपश्यना कोर्सची सविस्तर माहिती दिली.
प्रशिक्षणास उपस्थित असलेल्या ८६ केंद्रप्रमुखांपैकी ४४ केंद्रप्रमुखांनी १० दिवसांच्या विपश्यना शिबिरास जाण्याची इच्छा व्यक्त केली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी रवी जोशी सर यांनी केले.
फोटो— केंद्रप्रमुख प्रशिक्षण
👆 मोठ्या आकारात पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा
📌 प्रत्येक केंद्र अंतर्गत शिक्षण परिषदेची माहिती लवकरच उपलब्ध होईल.