जळगाव_Activities
केंद्र—प्रमुख प्रशिक्षण अहवाल
दिनांक 16 जुलै 2026 रोजी प.न.लुंकड कन्या शाळा जळगाव येथे केंद्रप्रमुख, आनापान साधना प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. प्रशिक्षणास एकूण 130 प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस सर्व प्रशिक्षणार्थींना आवश्यक Mitra App Download करण्याबाबत मार्गदर्शन बापू साळुंखे सर ,रुपेश मोरे सर ह्यांनी केले आले. प्रांजल पाटील सर ह्यांनी केंद प्रमुखान कडून IVRS नंबर डायल करून घेतला त्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थींची Registration प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. अनिल पाटील सर, ललिता चौधरी मॅडम, सुजल भोसले मॅडम ह्यांनी सेवा दिली.
उपस्थित प्रशिक्षणार्थींचे स्वागत प्रास्ताविक वाचन Mrs. धम्मिका इंगळे मॅडम ह्यांनी केले यानंतर Mr. अजय इंगळे ह्यांनी AudioTrack च्या माध्यमातून ७० मिनिटे आनापान प्रशिक्षण घेण्यात आले. नियमित आनापान साधनेच्या माध्यमातून मनाची एकाग्रता व शिस्त विकसित करण्याच्या दृष्टीने या प्रशिक्षणाचे महत्त्व योगेश पाटील सर चाळीसगाव ह्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमात म न पा जळगाव अधिकारी खलील शेख सर व गटशिक्षणाधिकारी जळगाव अजित तडवी सर उपस्थित होते व केंद्र प्रमुखांशी संवाद पण साधला आलेल्या प्रशिक्षणार्थी मधूनच G.R. चे वाचन भालेराव सर ह्यांनी केले 10 दिवसीय विपशना शिबिर व केंद्र संबंधित माहिती प्रश्न उत्तरे घेण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व प्रशिक्षणार्थींकडून Feedback Form भरून घेण्यात आला. प्रशिक्षणाबाबत प्रशिक्षणार्थींचे अभिप्राय व सूचना जाणून घेण्यात आल्या. जळगाव सेंटर ट्रस्टी विकास चौधरी सर ह्यांनी शिबिर फॉर्म भरण्याची माहिती दिली.
या प्रशिक्षणास विपश्यना आचार्य पुष्पा झंवर मॅडम उपस्थित होत्या आलेले सर्व केंद प्रमुखान हॉल मध्ये बसवताणा धम्मसेवक स्वर ठोके धम्मसेविका भारती ठोके ह्याचे सहकार्य लाभले एकूण 10 जणांनी सेवेचा लाभ घेतला
फोटो— केंद्रप्रमुख प्रशिक्षण
👆 मोठ्या आकारात पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा
📌 प्रत्येक केंद्र अंतर्गत शिक्षण परिषदेची माहिती लवकरच उपलब्ध होईल.