यवतमाळ_Activities
यवतमाळ—विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख प्रशिक्षण अहवाल
महाराष्ट्र शासन (शिक्षण विभाग) व विपश्यना विश्वविद्यापीठ, इगतपुरी, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच धम्ममल विपश्यना केंद्र, यवतमाळ व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET), यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळ जिल्ह्यातील सोळा तालुक्यांतील शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व साधक व्यक्तींसाठी मित्र उपक्रम अंतर्गत आनापान साधना प्रशिक्षण दिनांक २७ ऑगस्ट २०२६, शुक्रवार रोजी धम्ममल विपश्यना केंद्र, यवतमाळ येथे आयोजित करण्यात आले.
प्रशिक्षणाची दोन सत्रे अनुक्रमे सकाळी १०.०० ते दुपारी १.०० व दुपारी २.०० ते ५.०० अशी घेण्यात आली. पहिल्या सत्रात ८ महिला व ६९ अधिकारी यांनी नोंदणी करून आनापान प्रशिक्षणाचा लाभ घेतला, तर दुसऱ्या सत्रात १८ महिला व ६८ अधिकारी यांनी नोंदणी करून प्रशिक्षणाचा लाभ घेतला. तसेच एकूण १६५ केंद्रप्रमुख उपस्थित होते.
या कार्यक्रमात DIET च्या नोडल अधिकारी सांगवे मॅडम प्रामुख्याने उपस्थित होत्या. प्रबोधन सत्रातील G.R. चे वाचन डॉ. राधाकृष्ण सरकटे सर, प्रा. लाहोरे सर, रचनाताई मेश्राम मॅडम व श्री गौतमजी कुमारे यांनी केले.
मित्र उपक्रम प्रशिक्षण कार्यक्रमाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक (प्रमुख) आदरणीय श्री शांतारामजी शिंदे यांनी संपूर्ण प्रशिक्षणाचे शिस्तबद्ध पद्धतीने नियोजन केले व सर्व प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. डॉ. मेश्राम सर (नागपूर) यांनी १० दिवसीय विपश्यना शिबिराबाबत सविस्तर माहिती दिली.
श्री सुनील (नागपूर) व यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी श्री भुषण गडलिंग यांनी ७० मिनिटांचा आनापान साधना सराव करून घेतला. तसेच DIET च्या अधिव्याख्याता आदरणीय सांगाळे मॅडम यांनी शालेय जीवनात विद्यार्थ्यांमध्ये सजगता, मनाची एकाग्रता व मनाचे संतुलन निर्माण करण्यासाठी मित्र उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले.
श्री रमेशजी राऊत यांनीही प्रशिक्षणास भेट देऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या.
फोटो व व्हिडिओ — यवतमाळ विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख प्रशिक्षण
👆 मोठ्या आकारात पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा
📌 प्रत्येक केंद्र अंतर्गत शिक्षण परिषदेची माहिती लवकरच उपलब्ध होईल.