वर्धा_Activities
वर्धा—केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी प्रशिक्षण अहवाल
महाराष्ट्र शासन व विपश्यना रिसर्च इन्स्टिट्यूट, इगतपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने वर्धा जिल्ह्यातील केंद्रप्रमुख व विस्तार अधिकाऱ्यांसाठी मित्र उपक्रम आनापान साधना प्रशिक्षण दिनांक २० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी २.०० या वेळेत DIET कॉलेज, वर्धा येथे आयोजित करण्यात आले.
वर्धा जिल्ह्यात एकूण १०५ केंद्रप्रमुख असून, या प्रशिक्षणास ७१ केंद्रप्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमास DIET चे प्राचार्य श्री घोगरे सर तसेच डॉ. मेश्राम सर व श्री राउत सर (S.A.T.) उपस्थित होते.
प्रशिक्षणाच्या सुरुवातीस रजिस्ट्रेशनसाठी नीमसडकर सर, शंभरकर सर व बसाले सर यांनी मदत केली तसेच सर्व केंद्रप्रमुखांना मित्र अँप डाउनलोड करण्यासाठी मार्गदर्शन केले. DIET चे प्राचार्य श्री घोगरे सर यांचे स्वागत करण्यात आले.
डॉ. मेश्राम सर यांनी मित्र उपक्रमाबाबत माहिती दिली. त्यानंतर भुजाडे सर यांनी ऑडिओ ट्रॅकच्या माध्यमातून ७० मिनिटांचे आनापान साधना प्रशिक्षण देण्यात आले. G.R. चे वाचन केंद्रप्रमुख मॅडम यांनी केले.
प्रणोती मॅडम यांनी १० दिवसीय विपश्यना शिबिराचा कसा लाभ होतो याबाबत माहिती दिली. या प्रशिक्षणात ३१ केंद्रप्रमुखांनी १० दिवसीय विपश्यना कोर्स करण्याची इच्छा व्यक्त केली. यासाठी नागपूर टीमने मोलाचे सहकार्य केले.
प्रशिक्षणासाठी दोन धम्मसेवक व तीन धम्मसेविका उपस्थित होत्या. त्यात सुजाता तामगाडगे मॅडम (C.C.T.) यांचाही सहभाग होता. अशाप्रकारे वर्धा जिल्ह्यातील केंद्रप्रमुख मित्र उपक्रम कार्यशाळा सुरळीत पार पडली.
फोटो व व्हिडिओ — वर्धा केंद्रप्रमुख प्रशिक्षण
👆 मोठ्या आकारात पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा
📌 प्रत्येक केंद्र अंतर्गत शिक्षण परिषदेची माहिती लवकरच उपलब्ध होईल.