रत्नागिरी_Activities
रत्नागिरी—केंद्रप्रमुख प्रशिक्षण अहवाल
महाराष्ट्र शासन व विपश्यना रिसर्च इन्स्टिट्यूट, इगतपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मित्र उपक्रम’ अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील केंद्रप्रमुखांसाठी आनापान साधना प्रशिक्षण तीन टप्प्यांमध्ये आयोजित करण्यात आले.
दिनांक ३ जुलै २०२६ रोजी धम्मपदेश कोकण विपश्यना केंद्र येथे संगमेश्वर, राजापूर, रत्नागिरी आणि लांजा या चार तालुक्यांतील केंद्रप्रमुखांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणाची दोन सत्रे अनुक्रमे सकाळी १०.३० ते दुपारी १.३० आणि दुपारी २.०० ते ५.०० या वेळेत घेण्यात आली.
दिनांक ४ जुलै २०२६ रोजी फार्मसी कॉलेज, देवगड-चाटा, रावडे येथे चिपळूण व गुहागर या दोन तालुक्यांतील केंद्रप्रमुखांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणाची वेळ सकाळी १०.३० ते दुपारी १.३० अशी होती.
दिनांक ९ जुलै २०२६ रोजी धम्म उदक विपश्यना केंद्र, दापोली येथे मंडणगड, दापोली व खेड या तीन तालुक्यांतील केंद्रप्रमुखांसाठी प्रशिक्षण घेण्यात आले.
रत्नागिरी जिल्ह्यातील केंद्रप्रमुखांची एकूण संख्या २५४ असून, वरील सर्व प्रशिक्षण सत्रांमध्ये एकूण २५१ केंद्रप्रमुखांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला.
प्रशिक्षणादरम्यान संबंधित मित्र अँप डाउनलोड करण्यात आला. त्यानंतर प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले व ७० मिनिटांचे आनापान साधना सत्र घेण्यात आले. तसेच दिनांक ८ ऑगस्ट २०१९ रोजीच्या परिपत्रकाचे वाचन करण्यात आले. प्रशिक्षणाच्या शेवटी प्रशिक्षणार्थींकडून Feedback Form भरून घेण्यात आला.
फोटो व व्हिडिओ — रत्नागिरी केंद्रप्रमुख प्रशिक्षण
👆 मोठ्या आकारात पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा
📌 प्रत्येक केंद्र अंतर्गत शिक्षण परिषदेची माहिती लवकरच उपलब्ध होईल.