कोल्हापूर_Activities

📝

केंद्र—प्रमुख प्रशिक्षण अहवाल

महाराष्ट्र शासन, धम्मालया विपश्यना केंद्र, आळते, हातकलंगडे व प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर जिल्ह्यातील केंद्रप्रमुख शिक्षकांसाठी मित्र उपक्रम आनापान साधना प्रशिक्षण दिनांक २४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी २.०० या वेळेत स्वामी विवेकानंद कॉलेज, डॉ. बापूजी साळुंखे स्मृती भवन, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आले.

कोल्हापूर जिल्ह्यात एकूण १९० केंद्रप्रमुख शिक्षक असून, या प्रशिक्षणास १२१ केंद्रप्रमुख शिक्षक उपस्थित होते. तर ६९ केंद्रप्रमुख शिक्षक उपस्थित नव्हते. या प्रशिक्षणाचे सूत्रसंचालन श्री शांताराम शिंदे सर यांनी केले.

प्रशिक्षणास विपश्यना केंद्राचे ट्रस्टी श्री सुहास भोसले सर तसेच जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा कार्यक्रमाधिकारी श्री शशिकांत कदम सर उपस्थित होते. तसेच श्री कारंडे सर, भोसले मॅडम, श्री कोठीलकर सर व माने मॅडम या धम्मसेवक/धम्मसेविकांनी प्रशिक्षणासाठी सेवा दिली.

प्रशिक्षणाच्या सुरुवातीस केंद्रप्रमुखांचे स्वागत करण्यात आले व मित्र अँप डाउनलोड, रजिस्ट्रेशन तसेच आनापान साधना प्रशिक्षणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आनापान साधना, मित्र उपक्रम, शिक्षक व विद्यार्थ्यांना होणारे फायदे तसेच १० दिवसीय विपश्यना शिबिराबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रश्नोत्तर सत्र घेण्यात आले.

📸

फोटो व व्हिडिओ — कोल्हापूर केंद्रप्रमुख प्रशिक्षण

👆 मोठ्या आकारात पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा

📌 प्रत्येक केंद्र अंतर्गत शिक्षण परिषदेची माहिती लवकरच उपलब्ध होईल.