सोलापूर_Activities
सोलापूर—केंद्रप्रमुख प्रशिक्षण अहवाल
महाराष्ट्र शासन, धम्म सिद्धपुरी विपश्यना केंद्र, सोलापूर व प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर जिल्ह्यातील केंद्रप्रमुख शिक्षकांसाठी मित्र उपक्रम आनापान साधना प्रशिक्षण दोन भागांमध्ये आयोजित करण्यात आले. सोलापूर जिल्ह्यात एकूण २३३ केंद्रप्रमुख असून, यापैकी सोलापूर येथील प्रशिक्षणासाठी ७० तर पंढरपूर येथील प्रशिक्षणासाठी ८१ केंद्रप्रमुख उपस्थित होते. अशाप्रकारे दोन्ही प्रशिक्षणांमध्ये एकूण १५१ केंद्रप्रमुखांनी सहभाग घेतला, तर ८२ केंद्रप्रमुख उपस्थित नव्हते.
सोलापूर येथील प्रशिक्षण दिनांक २९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी २.०० या वेळेत मुख्याध्यापक भवन, जुना पुणे नाका, सोलापूर येथे आयोजित करण्यात आले. तर पंढरपूर येथील प्रशिक्षण दिनांक २ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी २.०० या वेळेत नेताजी स्पोर्ट्स क्लब, महात्मा फुले नगर, कराड रोड, पंढरपूर येथे आयोजित करण्यात आले.
दोन्ही ठिकाणी आयोजित केंद्रप्रमुख शिक्षकांच्या मित्र उपक्रम प्रशिक्षणाचे सूत्रसंचालन डॉ. यशवंत मुळे सर यांनी केले. प्रशिक्षणाच्या सुरुवातीस केंद्रप्रमुखांचे स्वागत करण्यात आले व मित्र अँप डाउनलोड, रजिस्ट्रेशन तसेच आनापान साधना प्रशिक्षणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
त्यानंतर प्रश्नोत्तर सत्र घेण्यात आले. यापूर्वी १० दिवसीय विपश्यना कोर्स पूर्ण केलेल्या केंद्रप्रमुखांनी आपला अनुभव सर्वांसमोर सांगितला.
प्रशिक्षण सुरळीत पूर्ण होण्यासाठी धम्मसेवक व धम्मसेविकांनी मोलाची सेवा दिली.
फोटो व व्हिडिओ — सोलापूर केंद्रप्रमुख प्रशिक्षण
👆 मोठ्या आकारात पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा
📌 प्रत्येक केंद्र अंतर्गत शिक्षण परिषदेची माहिती लवकरच उपलब्ध होईल.