नागपूर_Activities
केंद्र—प्रमुख प्रशिक्षण अहवाल
मित्र उपक्रमांतर्गत नागपूर जिल्ह्यातील केंद्रप्रमुखांसाठी दिनांक २८ जुलै, ३० जुलै व ३१ जुलै २०२६ रोजी चार वेगवेगळ्या ठिकाणी प्रशिक्षण सत्रे आयोजित करण्यात आली. उमरेड (जीवन विकास हायस्कूल), मौदा (भवन्स NTPC हायस्कूल), धम्मनाग विपश्यना सेंटर माहूरझरी आणि श्रेयस हायस्कूल नागपूर (URC 1 व 2) येथे ही सत्रे पार पडली. उमरेड, भिवापूर, कुही, मौदा, रामटेक, कळमेश्वर, सावनेर, नरखेड, पारशिवणी, नागपूर ग्रामीण आणि नागपूर शहर अशा विविध तालुक्यांतील केंद्रप्रमुखांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला. चारही सत्रांत मिळून १२६ केंद्रप्रमुख, १३ गट शिक्षण अधिकारी व शिक्षण विस्तार अधिकारी असे एकूण १३९ जण उपस्थित होते.
प्रत्येक सत्राच्या सुरुवातीस सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात आले, मित्र अँप डाउनलोड करण्यास मार्गदर्शन करण्यात आले व नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. प्रास्ताविकाद्वारे मित्र उपक्रमाची थोडक्यात माहिती देण्यात आली. उमरेड सत्रात BEO भिवापूर श्री. रुग्वेद भांडारकर, BEO उमरेड श्री. निरंजन गायकवाड व केंद्रप्रमुख कुही श्री. महेंद्र पारशे यांची प्रमुख उपस्थिती होती. मौदा सत्रात गट शिक्षण अधिकारी रामटेक श्री. विजय भाकरे व गट शिक्षण अधिकारी मौदा श्री. संकेत मारस्कोल्हे उपस्थित होते. धम्मनाग सत्रात कळमेश्वर, सावनेर, नरखेड, पारशिवणी व नागपूर ग्रामीण येथील गट शिक्षण व गटविकास अधिकारी उपस्थित होते. श्रेयस सत्रात विस्तार अधिकारी किरण किनारकर मॅडम उपस्थित होत्या.
प्रत्येक सत्रात Audio Track च्या माध्यमातून ७० मिनिटांचे आनापानसती प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान मित्र उपक्रमाची संकल्पना, उद्दिष्टे, शाळांमध्ये आनापान उपक्रम राबविण्याची कार्यपद्धती तसेच केंद्रप्रमुखांची भूमिका याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. शाळा स्तरावर आवश्यक नियोजन, समन्वय व प्रभावी अंमलबजावणी याबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर दि. ८ ऑगस्ट २०१९ च्या परिपत्रकाचे सामूहिक वाचन व प्रश्नोत्तर सत्र घेण्यात आले.
७० मिनिटांच्या आनापान सत्रानंतर सर्व केंद्रप्रमुखांनी अत्यंत सकारात्मक व शांत वाटत असल्याचे सांगितले. उपस्थित गट शिक्षण अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुखांनी मित्र उपक्रम हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच संपूर्ण शिक्षण विभागासाठी अत्यंत उपयुक्त व सकारात्मक उपक्रम असल्याचे मत व्यक्त केले. पुढील काळात आपापल्या कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये मित्र उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचा निर्धार सर्व केंद्रप्रमुखांनी मिळून केला.
📌 प्रत्येक केंद्र अंतर्गत शिक्षण परिषदेची माहिती लवकरच उपलब्ध होईल.
फोटो — केंद्रप्रमुख प्रशिक्षण सत्रे
👆 मोठ्या आकारात पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा
📍 उमरेड सत्र — २८ जुलै २०२६
📍 मौदा सत्र — २८ जुलै २०२६
📍 धम्मनाग सत्र — ३० जुलै २०२६
📌 प्रत्येक केंद्र अंतर्गत शिक्षण परिषदेची माहिती लवकरच उपलब्ध होईल.