नाशिक_Activities
केंद्र—प्रमुख प्रशिक्षण अहवाल
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग तसेच विपश्यना विशोधन विन्यास (VRI), इगतपुरी (जि. नाशिक) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या मित्र’ (Mind In Training For Right Awareness – MITRA) उपक्रमांतर्गत नाशिक जिल्ह्यातील केंद्रप्रमुखांसाठी आनापानसती प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेचे आयोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET), नाशिक, जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक व माध्यमिक), नाशिक आणि विपश्यना रिसर्च इन्स्टिट्यूट (VRI), इगतपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
नाशिक जिल्ह्यात केंद्रप्रमुखांची एकूण 243 पदे असून, उपलब्ध केंद्रप्रमुखांसाठी दिनांक 15 जुलै 2026 रोजी आनापानसती प्रशिक्षण आयोजित करण्यात आले सकाळ सत्र 11:00 ते 2:00 वाजेपर्यंत दुपार सत्र 2:30ते 5:30 पर्यन्त दोन्ही सत्र मिळून 231 केंद्रप्रमुख प्रशिक्षणास उपस्थित होते.
प्रशिक्षणार्थ्यांना सर्वप्रथम संबंधित ॲप डाउनलोड करून देण्यात आले. त्यानंतर त्यांचे नोंदणी (Registration) करून घेण्यात आली. सर्व प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणाच्या सभागृहात बसविण्यात आले. उपस्थित सर्व केंद्रप्रमुख व मान्यवरांचे स्वागत करून ‘मित्र’ उपक्रमाविषयी प्रस्तावनेद्वारे थोडक्यात माहिती देण्यात आली.
कार्यक्रमातील प्रमुख भाग म्हणून ऑडिओ ट्रॅकच्या माध्यमातून सुमारे 70 मिनिटांचे आनापानसती प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान सहभागी केंद्रप्रमुखांनी शांत, शिस्तबद्ध आणि एकाग्र वातावरणात आनापानसती ध्यानाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
यानंतर उपस्थित केंद्रप्रमुखांपैकी एका केंद्रप्रमुखांकडून दिनांक 8 ऑगस्ट 2019 रोजीच्या परिपत्रकाचे सामूहिक वाचन करण्यात आले.
पुढे शैक्षणिक परिषदेमध्ये कोणकोणत्या बाबी करावयाच्या आहेत, तसेच शिक्षकांचे प्रशिक्षण कोणत्या पद्धतीने घ्यावयाचे आहे, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेदरम्यान आनापानसती ध्यानाची संकल्पना, साधनेची पद्धत, तिच्यामागील तत्त्वज्ञान तसेच शालेय स्तरावरील उपयुक्तता याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. दहा दिवशीय विपश्यना बाबत आवश्यक माहिती देण्यात आली. उपस्थित प्रशिक्षणार्थाच्या समर्पक उत्तरे देण्यात आली.
कार्यशाळेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे तीन तासांच्या प्रशिक्षण कालावधीत सर्व केंद्रप्रमुखांनी उल्लेखनीय एकाग्रता, शिस्त, शांतता आणि सक्रिय सहभाग कायम ठेवला. आनापानसती साधनेचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतर सहभागी केंद्रप्रमुखांनी या साधनेबाबत सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
प्रशिक्षणानंतर आयोजित अनुभवकथन सत्रात सहभागी केंद्रप्रमुखांनी आनापानसती साधनेचा सकारात्मक अनुभव व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच त्यांच्या एकाग्रता, मानसिक स्वास्थ्य आणि भावनिक संतुलनासाठी अशा प्रकारचे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आनापान प्रशिक्षणाचे यश ‘मित्र’ उपक्रमांतर्गत नाशिक जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेले केंद्रप्रमुखांचे आनापानसती प्रशिक्षण उत्साहपूर्ण वातावरणात आणि यशस्वीरित्या पार पडले.
प्रशिक्षित केंद्रप्रमुखांच्या माध्यमातून आगामी काळात नाशिक जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये आनापानसती साधना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे शक्य होणार आहे. विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य, एकाग्रता, भावनिक संतुलन आणि सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास यासाठी ‘मित्र’ उपक्रम निश्चितच महत्त्वपूर्ण व प्रभावी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
फोटो व व्हिडिओ — केंद्रप्रमुख प्रशिक्षण
👆 मोठ्या आकारात पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा
📌 प्रत्येक केंद्र अंतर्गत शिक्षण परिषदेची माहिती लवकरच उपलब्ध होईल.