नंदुरबार_Activities
केंद्र—प्रमुख प्रशिक्षण अहवाल
दिनांक २५ ऑगस्ट २०२६ रोजी वेल वेदर इंटरनॅशनल स्कूल, नंदुरबार येथे केंद्रप्रमुखांसाठी आनापान प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर प्रशिक्षणास एकूण ६० प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस सर्व प्रशिक्षणार्थींना आवश्यक App Download व VRI नंबर डायल करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले व सर्वांची Registration प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती धम्मिका अजय ईंगळे मॅडम यांनी केले. उपस्थित प्रशिक्षणार्थींचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर मा. वसंतरावजी गोसर सर (SAT वरिष्ठ आचार्य, धुळे) यांनी विपश्यनाविषयी माहिती दिली व कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करण्यात आले. प्रास्तावनेचे वाचन राकेश बिऱ्हाडे (मित्र सेवक, नवापूर) यांनी केले.
कार्यक्रमातील प्रमुख भाग म्हणून Audio Track च्या माध्यमातून सुमारे ७० मिनिटांचे आनापान प्रशिक्षण घेण्यात आले. प्रशिक्षणार्थींना आनापान साधनेची पद्धत प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळाली. नियमित आनापान साधनेच्या माध्यमातून मनाची एकाग्रता व शिस्त विकसित करण्याच्या दृष्टीने या प्रशिक्षणाचे महत्त्व स्पष्ट झाले. त्यानंतर G.R. चे वाचन करण्यात आले व प्रशिक्षणार्थींना आवश्यक मार्गदर्शन व सूचना देण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व प्रशिक्षणार्थींकडून Feedback Form भरून घेण्यात आला. प्रशिक्षणाबाबत प्रशिक्षणार्थींचे अभिप्राय व सूचना जाणून घेण्यात आल्या. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे श्री. राकेश बिऱ्हाडे यांनी आभार मानले. सर्व प्रशिक्षणार्थींसाठी सकाळचा चहा-बिस्किटांची व्यवस्था धम्म प्रभास विपश्यना सेंटर, नंदुरबार यांच्या वतीने करण्यात आली होती.
एकूण ६० केंद्रप्रमुखांच्या सहभागामुळे हा आनापान प्रशिक्षण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व यशस्वीरित्या संपन्न झाला. मा. वसंतरावजी गोसर सर, मा. शांतारामजी पानपाटील, मा. हिरामनजी राजपूत सर, मा. अजयजी ईंगळे सर, मा. प्रवीणजी धंधरे सर, मा. पिंपळे सर, मा. गोपाल पटेल सर, मा. महेंद्र बैसाणे सर, मा. मराठे सर (विपश्यना शिक्षक) तसेच कार्यक्रमाच्या नियोजन, आयोजन व अंमलबजावणीसाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्व धम्मसेवक, सेविका व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार.
फोटो व व्हिडिओ — केंद्रप्रमुख प्रशिक्षण
👆 मोठ्या आकारात पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा
📌 प्रत्येक केंद्र अंतर्गत शिक्षण परिषदेची माहिती लवकरच उपलब्ध होईल.