पालघर_Activities
केंद्र—प्रमुख प्रशिक्षण अहवाल
महाराष्ट्र शासन व विपश्यना विशोधन संस्था यांच्या अंतर्गत मित्र उपक्रम तर्फे पालघर जिल्ह्यातील केंद्रप्रमुखांसाठी दिनांक 03 सप्टेंबर 2026 रोजी Palghar Usha Resort येथे सकाळी 8.00 ते 10.00 या वेळेत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
या प्रशिक्षणास एकूण 20 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. पालघर जिल्ह्यातील केंद्रप्रमुखांची एकूण संख्या 151 आहे.
प्रशिक्षणार्थींना सर्वप्रथम संबंधित ॲप डाउनलोड करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थींची नोंदणी (Registration) करून घेण्यात आली. यानंतर सर्व प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणाच्या सभागृहात बसविण्यात आले. प्रशिक्षणाच्या प्रस्ताविकेचे वाचन अश्विनी खैरे यांनी केले. त्यानंतर 70 मिनिटांचा ऑडिओ ट्रॅक प्रशिक्षणार्थींना ऐकविण्यात आला.
त्यानंतर दिनांक 8 ऑगस्ट 2019 रोजीच्या परिपत्रकाचे वाचन प्रशिक्षणार्थींकडून करून घेण्यात आले.
पुढे शैक्षणिक परिषदेमध्ये कोणकोणत्या बाबी करावयाच्या आहेत, तसेच शैक्षणिक परिषद कोणत्या पद्धतीने आयोजित करावी, याबाबतची सविस्तर माहिती रत्नश्री गायकवाड यांनी प्रशिक्षणार्थींना दिली.
यानंतर प्रशिक्षणार्थींकडून अनुभवपत्र भरून घेण्यात आले. तसेच 10 दिवसीय विपश्यना कोर्स याबाबत आवश्यक माहिती देण्यात आली. शेवटी मित्र उपक्रम - एक परिचय हा 13 मिनिटांचा व्हिडिओ प्रशिक्षणार्थींना दाखविण्यात आला.
तसेच उपस्थित प्रशिक्षणार्थींच्या विविध प्रश्नांचे निरसन करण्यात आले. प्रशिक्षणार्थींनी 10 दिवसीय विपश्यना कोर्सला जाण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, त्यासाठी अनुमती दर्शविली.
फोटो व व्हिडिओ — केंद्रप्रमुख प्रशिक्षण
👆 मोठ्या आकारात पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा
📌 प्रत्येक केंद्र अंतर्गत शिक्षण परिषदेची माहिती लवकरच उपलब्ध होईल.