मुंबई शहर व मुंबई उपनगर_Activities

📝

केंद्र—प्रमुख प्रशिक्षण अहवाल

महाराष्ट्र शासन व विपश्यना विशोधन संस्था यांच्या अंतर्गत मित्र उपक्रम तर्फे मुंबई शहर व मुंबई उपनगरातील केंद्रप्रमुखांसाठी दिनांक 10 ऑगस्ट 2026 ते 13 ऑगस्ट 2026 या कालावधीत विपश्यना ग्लोबल Vipassana पॅगोडा येथे दुपारी 12.00 ते 3.00 या वेळेत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. .

या प्रशिक्षणामध्ये मुंबई महानगरपालिकेचे एकूण 86 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. त्यामध्ये 54 CRC प्रमुख व 32 शिक्षक यांचा समावेश होता. मुंबई महानगरपालिकेतील एकूण CRC प्रमुखांची संख्या 144 आहे.

तसेच मुंबई उपनगरातील तीनही विभागांतून पुढीलप्रमाणे विषयसाधन व्यक्तींची उपस्थिती होती:

D.Y.D. — 8

पश्चिम विभाग — 10 विषयसाधन व्यक्ती

उत्तर विभाग — 3 विषयसाधन व्यक्ती

दक्षिण विभाग — 9 विषयसाधन व्यक्ती

प्रशिक्षणार्थींना सर्वप्रथम संबंधित ॲप डाउनलोड करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर त्यांचे नोंदणी (Registration) करून घेण्यात आले. प्रशिक्षणार्थींसाठी चहा व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती.

यानंतर सर्व प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणाच्या सभागृहात बसविण्यात आले. प्रशिक्षणाच्या प्रस्ताविकेचे वाचन रत्नश्री गायकवाड यांनी केले. त्यानंतर 70 मिनिटांचा ऑडिओ ट्रॅक लावण्यात आला.

त्यानंतर 8 ऑगस्ट 2019 रोजीच्या परिपत्रकाचे वाचन प्रशिक्षणार्थींकडून करून घेण्यात आले. पुढे शैक्षणिक परिषदेमध्ये कोणकोणत्या बाबी करावयाच्या आहेत तसेच परिषद कशा पद्धतीने घ्यावयाची, याबाबतची सविस्तर माहिती अश्विनी खैरे यांनी दिली.

यानंतर प्रशिक्षणार्थींकडून अनुभवपत्र भरून घेण्यात आले. तसेच 10 दिवसीय विपश्यना कोर्स याबाबत आवश्यक माहिती देण्यात आली.

शेवटी मित्र उपक्रम — एक परिचय हा 13 मिनिटांचा व्हिडिओ प्रशिक्षणार्थींना दाखविण्यात आला.

तसेच उपस्थित प्रशिक्षणार्थींच्या काही प्रश्नांना उत्तरे देण्यात आली. प्रशिक्षणार्थींनी 10 दिवसीय विपश्यना कोर्सला जाण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद व अनुमती दर्शविली.

सदर प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये मुंबई शहर व मुंबई उपनगरातील केंद्रप्रमुख, शिक्षक व विषयसाधन व्यक्तींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. प्रशिक्षणादरम्यान केंद्रप्रमुखांना shikshan परिषद आयोजन, ॲपचा वापर तसेच 10 दिवसीय विपश्यना कोर्स याबाबत आवश्यक मार्गदर्शन व माहिती देण्यात आली.

एकूणच, सदर प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.

📸

फोटो व व्हिडिओ — केंद्रप्रमुख प्रशिक्षण

👆 मोठ्या आकारात पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा

📌 प्रत्येक केंद्र अंतर्गत शिक्षण परिषदेची माहिती लवकरच उपलब्ध होईल.