पुणे_Activities
केंद्र—प्रमुख प्रशिक्षण अहवाल
दिनांक 5 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी ११.०० ते २.०० मरकळ विपश्यना सेंटर पुणे येथे केंद्रप्रमुख यांच्यासाठी आनापान सती प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रशिक्षणार्थींचे रजिस्ट्रेशन पूर्ण करून मित्र ॲप डाऊनलोड करण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले, त्यानंतर मा. भाऊसाहेब कारेकर साहेब (शिक्षण अधिकारी, माध्यमिक जि. प.पुणे) यांनी कार्यक्रमाचे उदघाटन करून उपस्थित केंद्र प्रमुखांना प्रोत्साहन दिले मित्र उपक्रम का महत्वाचा आहे हे सांगितले आणि लक्षपूर्वक प्रशिक्षण ग्रहण करा असे सांगितले. आदरणीय सिद्धार्थ चव्हाण सर (माजी शिक्षणाधिकारी जि. प. पुणे तसेच सध्याचे तसेच सध्याचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.पुणे यांचे मुख्य शैक्षणिक सल्लागार) यांची उपस्थिती होती. खाडे साहेबांनी(गटशिक्षणाधिकारी) आनापनामुळे होणाऱ्या फायद्यांची थोडक्यात माहिती केंद्रप्रमुखांना दिली. कार्यक्रमात पुढे उपस्थितांचे स्वागत करून त्यांना उपक्रमाविषयी थोडक्यात माहिती प्रास्ताविकाद्वारे देण्यात आली. कार्यक्रमातील प्रमुख भाग ऑडिओ ट्रॅकच्या माध्यमातून 70 मिनिटांचे आनापान प्रशिक्षण घेण्यात आले. जीआर वाचनाद्वारे प्रशिक्षणार्थींना मित्र उपक्रम राबवण्यासंदर्भात आवश्यक मार्गदर्शन व सूचना देण्यात आल्या.
प्रशिक्षणात एकूण १२० केंद्रप्रमुख उपस्थित होते ( तालुका - वेल्हे (राजगड), हवेली, मुळशी, भोर, मावळ , शिरूर, खेड ) त्यातील ८ केंद्रप्रमुखांनी दहा दिवसांचे शिबिर पूर्ण केलेले आहे आणि 65 केंद्रप्रमुख दहा दिवसांच्या शिबिराला जाण्यास इच्छुक आहे.
प्रत्यक्ष 70 मिनिटांच्या आनापानाचा अनुभव , सेंटरवरील प्रसन्न वातावरण आणि शिस्तबद्ध नियोजन या गोष्टींच्या परिणामास्वरूप 65 केंद्रप्रमुखांनी दहा दिवसांच्या विपश्यना शिबिरास जाण्याची इच्छा व्यक्त केली तसेच केंद्रप्रमुखांनी आपल्या केंद्रात हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू असा निर्धार व्यक्त केला. पुण्यातील धम्म सेवकांच्या सहकार्यामुळे मित्र उपक्रम अंतर्गत केंद्रप्रमुखांच्या अनापान साधनेचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पार पडले.
फोटो व व्हिडिओ — केंद्रप्रमुख प्रशिक्षण
👆 मोठ्या आकारात पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा
📌 प्रत्येक केंद्र अंतर्गत शिक्षण परिषदेची माहिती लवकरच उपलब्ध होईल.