परभणी_Activities
केंद्र—प्रमुख प्रशिक्षण अहवाल
दिनांक १८ ऑगस्ट २०२६ रोजी 'मित्र' उपक्रम (Mind In Training For Right Awareness – MITRA) अंतर्गत परभणी जिल्हा केंद्रप्रमुखांसाठी आनापान साधनेचे तीन तासांचे प्रशिक्षण जिजाऊ ज्ञानतीर्थ परिसर, परभणी येथे सकाळी १०.०० ते दुपारी १.०० या वेळेत आयोजित करण्यात आले. परभणी जिल्ह्यात केंद्रप्रमुखांची एकूण संख्या ८६ असून यापैकी ८ केंद्रप्रमुख आणि प्रत्येक केंद्रामधून २ किंवा ३ सहशिक्षक असे एकूण २२९ सहशिक्षक हजर होते. म्हणजेच ८ केंद्रप्रमुख व २२९ सहशिक्षक असे एकूण २३७ जण प्रशिक्षणाला उपस्थित होते.
सर्वप्रथम प्रशिक्षणासाठी उपस्थित असलेल्यांची नोंदणी (Registration) करून घेण्यात आली व सर्वांच्या मोबाईलमध्ये मित्र App डाउनलोड करून घेण्यात आले. मंचावर परभणी DIET चे प्राचार्य मा. सुदर्शन चिटकुलवार सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत मा. एस. एस. शिंदे सर यांनी केले व मित्र उपक्रमाविषयी थोडक्यात माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मा. भिमराव कावळे सर (विश्वस्त, विपश्यना समिती परभणी) यांनी केले. त्यानंतर प्रस्तावनेचे वाचन करण्यात आले.
त्यानंतर ऑडिओ ट्रॅकच्या माध्यमातून सुमारे ७० मिनिटांचे आनापानसती प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर मा. आनंद रुगले सर यांनी दि. ८ ऑगस्ट २०१९ च्या परिपत्रकाचे सामूहिक वाचन केले. पुढे शिक्षण परिषदेत करावयाच्या बाबी तसेच शिक्षकांचे प्रशिक्षण कोणत्या पद्धतीने घ्यावयाचे याबाबत मा. एस. एस. शिंदे सर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. प्रत्येक शिक्षकाने दहा दिवसीय विपश्यना शिबिर करण्याबाबत आवश्यक माहिती देण्यात आली व उपस्थित केंद्रप्रमुख व सहशिक्षक यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देण्यात आली.
७० मिनिटे आनापानसती साधनेचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतर सहभागी केंद्रप्रमुख व सहशिक्षक यांनी साधनेबाबत सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. उपस्थितांचे Feedback Form भरून घेण्यात आले, ज्यात त्यांनी आपले अनुभव कथन केले. ५ केंद्रप्रमुख व ४८ सहशिक्षक असे एकूण ५३ जण १० दिवसीय विपश्यना शिबिरास जाण्यास इच्छुक असल्याचे नमूद केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेवटी उपस्थितांचे आभार मा. आनंद रुगले सर यांनी व्यक्त केले.
सदर प्रशिक्षणाला धम्मसेवक भिमराव कावळे सर व आनंद रुगले सर (विश्वस्त, विपश्यना समिती परभणी) यांचे फार मोलाचे सहकार्य लाभले. अशाप्रकारे केंद्रप्रमुखांचे आनापान प्रशिक्षण परभणी येथे उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडले.
फोटो व व्हिडिओ — केंद्रप्रमुख प्रशिक्षण
👆 मोठ्या आकारात पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा
📌 प्रत्येक केंद्र अंतर्गत शिक्षण परिषदेची माहिती लवकरच उपलब्ध होईल.