बीड_Activities
केंद्र—प्रमुख प्रशिक्षण अहवाल
महाराष्ट्र शासन व विपश्यना रिसर्च इन्स्टिट्यूट, इगतपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने बीड जिल्ह्यातील केंद्रप्रमुखांसाठी दोन दिवसीय आनापान साधना प्रशिक्षण कार्यशाळा दिनांक २१ व २२ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० या वेळेत विपश्यना साधना केंद्र, वरचा मजला, छत्रपती संकुल, अण्णाभाऊ साठे चौक, सुभाष रोड, बीड येथे आयोजित करण्यात आली. पहिल्या दिवशी (२१ ऑगस्ट) ७३ तर दुसऱ्या दिवशी (२२ ऑगस्ट) ६२ असे एकूण १३५ केंद्रप्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमास उत्तमराव कांबळे सर (वरिष्ठ सहाय्यक आचार्य), एस. एस. शिंदे सर, डॉ. भागिरथी गिरी मॅडम (वरिष्ठ अधिव्याख्याता, DIET आंबेजोगाई), प्रतिभा देशपांडे मॅडम (अधिव्याख्याता, DIET आंबेजोगाई) तसेच श्रीमती अंजुम मॅडम (उपशिक्षणाधिकारी प्राथमिक, जि.प. बीड) यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यशाळेच्या सुरुवातीस एस. एस. शिंदे सर, प्रकाश बनसोडे व शुभम हिवराळे यांनी सर्व केंद्रप्रमुखांना मित्र अँप डाउनलोड करण्याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर जोगदंड आदित्य व वाघमारे सनी यांनी रजिस्ट्रेशन सेवा दिली. उपस्थित केंद्रप्रमुखांचे स्वागत शिंदे सर व प्रकाश बनसोडे यांनी केले तर प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन डावकर शरद सर व सुभाष गायकवाड सर यांनी केले.
त्यानंतर शुभम हिवराळे सर यांनी ऑडिओ ट्रॅकच्या माध्यमातून ७० मिनिटांचे आनापान साधना प्रशिक्षण देण्यात आले. G.R. चे सामूहिक वाचन डावकर शरद सर व सुभाष गायकवाड सर यांनी केले. शिंदे सर व प्रकाश बनसोडे यांनी १० दिवसीय विपश्यना शिबिर व विपश्यना केंद्रासंबंधी सविस्तर माहिती दिली. त्यानंतर प्रश्नोत्तर सत्र घेण्यात आले. ज्या केंद्रप्रमुखांनी १० दिवसीय विपश्यना कोर्स पूर्वी केलेला आहे त्यांनी आपला अनुभव सर्वांसमोर सांगितला.
प्रशिक्षणानंतर डॉ. भागिरथी गिरी मॅडम यांनी सर्व केंद्रप्रमुखांना आपापल्या केंद्रात येणाऱ्या शिक्षण परिषदेत सर्व शिक्षकांचे प्रशिक्षण कसे पूर्ण करायचे याबाबत सूचना व मार्गदर्शन केले. धम्म हॉलमधून बाहेर आल्यावर वृषाली ताई पंडित (धम्मसेविका) यांनी सर्व केंद्रप्रमुखांना आनापान साधनेचे महत्त्व तसेच शिक्षकांना व विद्यार्थ्यांना होणारे फायदे समजावून सांगितले. मिसाळ संजू, जोगदंड राजू, उनवणे रावसाहेब, पंडित राजेश कुमार, मंडलिक भीमराव, डावकर ताई (धम्मसेवक/धम्मसेविका) यांनी प्रशिक्षण सुरळीत पूर्ण होण्यासाठी मोलाची सेवा दिली.
उपस्थित ९७ केंद्रप्रमुखांनी Feedback Form भरून दिला, त्यापैकी ६१ केंद्रप्रमुखांनी १० दिवसीय विपश्यना कोर्स करण्याची इच्छा व्यक्त केली. या प्रशिक्षणाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे एका केंद्रप्रमुखाने प्रशिक्षण संपताच लगेच २ सप्टेंबर २०२६ रोजी धम्मगिरी येथील शिबिरासाठी ऑनलाईन फॉर्म भरला — हे या प्रशिक्षणाच्या सकारात्मक प्रभावाचे उत्तम उदाहरण ठरले.
फोटो व व्हिडिओ — केंद्रप्रमुख प्रशिक्षण
👆 मोठ्या आकारात पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा
📌 प्रत्येक केंद्र अंतर्गत शिक्षण परिषदेची माहिती लवकरच उपलब्ध होईल.